RTO Officers  sakal
महाराष्ट्र बातम्या

RTO Officers : आरटीओ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे ‘पासिंग’ ; आठवडाभरात निघणार नियुक्ती आदेश,आवडत्या जागी पोस्टिंग

लोकसभेच्या निवडणुकांसाठी राज्यात लागलेली आचारसंहिता शिथिल होताच परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदोन्नती व बदली होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लोकसभेच्या निवडणुकांसाठी राज्यात लागलेली आचारसंहिता शिथिल होताच परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदोन्नती व बदली होणार आहे. परिवहन विभागाच्या विभागीय पदोन्नती समितीने (डीपीसी) तयार केलेल्या अधिकाऱ्यांच्या यादीची फाइल सध्या मुख्यमंत्री कार्यालयात आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांची यापूर्वीच सही झाल्याचे परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

राज्याच्या परिवहन विभागातील २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदोन्नती होणार आहे. परिवहन विभागाच्या विभागीय पदोन्नती समितीने (डीपीसी) अशा अधिकाऱ्यांची यादी तयार करून परिवहन मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री कार्यालयात पाठवले. त्या दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने आरटीओच्या पदोन्नतीचे ‘पासिंग’ रखडले होते.

आता आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. यात ‘त्या’ चार वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या नावाचा देखील समावेश आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून अधिकाऱ्यांची पदोन्नती रखडली होती. ती आता मार्गी लागत आहे. या बदल्या ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. मात्र यात देखील आर्थिक व्यवहार झाल्याचे आरटीओच्या वर्तुळात बोलले जात आहे.

राज्यातील लोकसभेची निवडणूक पार पडताच या प्रक्रियेला गती आली आहे. विविध अधिकारी अद्याप बदलीचा आदेश निघाला नसल्याने मागील काही दिवसांत मुंबईला खेट्या मारून आपल्या आवडत्या जागी पोस्टिंग मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत. कोणत्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न सफल झाले हे पदोन्नतीचे आदेश निघताच कळणार आहे.

बदलीची चर्चा

आरटीओ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता राहावी म्हणून यंदा प्रथमच परिवहन विभागाने बदली प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने लागू करण्याचा निर्णय घेतला. बदल्यांचा आदेश अद्याप निघालेला नाही. तरीही काही अधिकाऱ्यांची संभाव्य पदोन्नती व बदली कुठे होणार आहे. याची चर्चा आरटीओ वर्तुळात रंगली आहे.

अधिकाऱ्यांची नावे सध्याचे ठिकाण संभाव्य ठिकाण

  • अर्चना गायकवाड- सोलापूर चंद्रपूर

  • प्रदीप शिंदे- नाशिक पुणे

  • संजीव भोर -पुणे छत्रपती संभाजीनगर

  • दीपक पाटील-कोल्हापूर जळगाव

  • रवींद्र भुयार -नागपूर अकोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT