Narendra Modi 
महाराष्ट्र बातम्या

Modi Cabinet: नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील या नेत्यांची लागणार वर्णी? शिवसेना आणि राष्ट्रवादीचा उचित सन्मान!

कार्तिक पुजारी

नवी मोदी- नरेंद्र मोदी हे रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. उद्या सायंकाळी भव्य असा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासह इतर काही नेते पदाची शपथ घेतील. राज्यातील कोणते नेते यावेळी शपथ घेतील याबाबत उत्सुकता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील नेत्यांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते.

महाराष्ट्रातून भाजपच्या दोन नेत्यांना केंद्रीय मंत्रीपद आणि दोघांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. यात पियूष गोयल, नितीन गडकरी, उदयनराजे भोसले, हेमंत सावरा, रक्षा खडसे या नेत्यांची चर्चा आहे. शिवसेनेचा एक खासदार मंत्रीपदाची शपथ घेईल. यामध्ये प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे या तीन नावांची चर्चा आहे. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी काही खासदार आग्रही आहेत, मात्र त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता कमी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला एक मंत्रीपद मिळू शकतं. यासाठी प्रफुल्ल पटेल यांना संधी दिली जाऊ शकते. नरेंद्र मोदी यांच्यासोबत कोणते नेते शपथ घेतील हे उद्या सायंकाळी स्पष्ट होईल. मात्र, भारतीय जनता पक्ष घटक पक्षांचा योग्य सन्मान राखेल अशी चर्चा आहे.

भाजप - (महाराष्ट्रातून २ केंद्रीय मंत्री तर २ राज्यमंत्र्यांना संधी मिळण्याची शक्यता)

पियूष गोयल

नितीन गडकरी

उदयनराजे भोसले

हेमंत सावरा

रक्षा खडसे

शिवसेना - (१ मंत्री शपथ घेईल)

प्रतापराव जाधव

श्रीरंग बारणे

श्रीकांत शिंदे (यांच्यासाठी काही खासदार आग्रही आहेत, मात्र मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी आहे)

राष्ट्रवादी - (१ मंत्री शपथ घेईल)

प्रफुल पटेल

नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी संसदेत झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीमध्ये गटनेता म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाची शपथ घेतील हे स्पष्ट आहे. मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. याशिवाय, मोदी रविवारी सायंकाळी सहा वाजता आपल्या मोजक्या नेत्यांसह पदाची शपथ घेतील.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाही. भाजपला २४० जागांवर समाधान मानावे लागले आहे. २७२ च्या जादुई आकड्यापासून भाजप दूर असल्याने त्यांना एनडीएतील घटक पक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. त्यामुळे एनडीएतील जनता दल संयुक्त आणि तेलुगु देसम पार्टी यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या दोन्ही पक्षांनी केंद्रात महत्त्वाची खाती मिळणार आहेत. त्यासाठी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी भाजपवर दबाव वाढवला असल्याची माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT