गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना दिसून येत आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना ज्या पहाटेच्या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप आला होता त्याबाबत खळबळजनक गौप्यस्फोट केले. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथ घेऊन स्थापन केलेलं सरकार जास्त टिकलं नाही.
या सर्व राजकीय घडामोडींची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना होती असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी शपथविधीची आठवण पुन्हा एकदा करून दिली. महत्त्वाचं म्हणजे या सत्तास्थापनेबद्दल शरद पवार यांना माहिती असल्याचं उघड नव्हतं. यासोबतच देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा विश्वासघात करणाऱ्या नेत्याची नाव देखील यावेळी सांगितली आहेत.
तर देवेंद्र फडणवीसांनी मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले की, माझा सर्वात मोठा विश्वासघात हा पवारांनी नाहीतर उद्धव ठाकरे यांनी केला आहे. माझ्यासोबत विश्वासघात दोनवेळा झाला. पहिला विश्वासघात उद्धव ठाकरेंनी केला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या. आमच्यासोबत निवडून आले.
निवडणुकीच्या कार्यक्रमात मोदीजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे म्हणत होते तेव्हा ते टाळ्या वाजवत होते. पण ज्यावेळी नंबर लक्षात आला की आपल्याला मुख्यमंत्री होता येईल. त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. माझ्याशी कसलीही चर्चाही केली नाही. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची खूर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत निघून गेले असं फडणवीस म्हणाले आहेत.
पुढे दुसऱ्या विश्वासघातांबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुसरा विश्वासघात आमच्यासोबत केला त्यांना मी कमी दोष देईन. कारण त्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली नव्हती. ज्यावेळी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत चर्चा करत आहेत. त्यांची चर्चा पुढे गेलीय हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली की आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. म्हणून आपण सरकार तयार करुया असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.