Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

लोकसभेच्या तोंडावर भाजपसह अजितदादा गटाच्या नेत्यांच्या 13 कारखान्यांना 1898 कोटींचं कर्ज देण्यास सरकारची हमी!

१३ साखर कारखान्यांत आमदार डॉ. विनय कोरे (Vinay Kore) यांच्या वारणा साखर कारखान्याचा समावेश आहे.

सकाळ डिजिटल टीम

यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपला समर्थन करणाऱ्या १३ साखर कारखान्यांची समितीने निवड केली. त्यात भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे सात आणि एक कारखाना काँग्रेसशी संबंधित आमदाराचा आहे.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) तोंडावर राज्यातील भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (Ajit Pawar) नेत्यांच्या १३ कारखान्यांना १८९८ कोटी रुपयांचे कर्ज देण्यास राज्य सरकारने हमी दिली. राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून हे कर्ज मिळणार आहे. आचारसंहितेपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, कर्ज हमी मिळालेल्या १३ साखर कारखान्यांत आमदार डॉ. विनय कोरे (Vinay Kore) यांच्या वारणा साखर कारखान्याचा समावेश असून, या कारखान्याला ३५० कोटींच्या कर्जाला हमी मिळाली आहे. यात काँग्रेसचे बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघातील आमदार संग्राम थोपटे यांच्याही कारखान्याचा समावेश आहे. थोपटे यांच्या राजगड साखर कारखान्यास (भोर) ८० कोटी रुपयांची कर्जहमी देण्यात आली आहे.

राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींकडून सरकारकडे खेळत्या भांडवलावरील कर्जाच्या मागणीचा प्रस्ताव पाठवला होता. यावर आचारसंहितेपूर्वी राज्यातील प्रस्ताव पाठवलेल्या कारखान्यांची छाननी करून त्यानुसार सरकारच्या हमीवर कर्जाचे प्रस्ताव राष्ट्रीय सहकार विकास निगमला पाठविण्यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.

यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपला समर्थन करणाऱ्या १३ साखर कारखान्यांची समितीने निवड केली. त्यामध्ये भाजपचे पाच राष्ट्रवादीचे सात आणि एक कारखाना काँग्रेसशी संबंधित आमदाराचा आहे. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटातील काही आमदारांच्या कारखान्यांना ही मदत नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. कर्जहमीचा प्रस्ताव एनसीडीसीला पाठविण्यात आला असून, त्यांची मान्यता मिळताच कर्जाची रक्कम सरकारकडे जमा होईल.

हमी मिळालेले कारखाने गटनिहाय असे

अजित पवार गट

  • लोकनेते सुंदररावजी सोळंके साखर कारखाना (बीड) १०४ कोटी

  • किसनवीर (सातारा) ३५० कोटी

  • किसनवीर (खंडाळा) १५० कोटी

  • लोकनेते मारोतराव घुले-पाटील ज्ञानेश्वर कारखाना (नेवासा) १५० कोटी

  • अगस्ती (अहमदनगर) १०० कोटी

  • अंबाजोगाई (बीड) ८० कोटी

  • शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) ११० कोटी

भाजपशी संबंधित

  • संत दामाजी (मंगळवेढा) १०० कोटी

  • वृद्धेश्वर (पाथर्डी) ९९ कोटी

  • सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे ( कोपरगाव) १२५ कोटी

  • बसवराज पाटील यांचा विठ्ठलसाई (धाराशिव) १०० कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT