महाराष्ट्र बातम्या

पावसात भिजले असाल तर ओले कपडे अंगावर फार काळ ठेवू नका अन्यथा...; वाचा त्वचारोग तज्ज्ञांचे मत

CD

मुंबई: पावसाळा सुरू झाला, की पावसाळी आजारांसह फंगल इन्फेक्शनही वाढते. ज्यामुळे त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. पावसात भिजल्यानंतर अनेकदा ओले कपडे अंगावर काही तास तसेच राहतात.

त्यामुळे बॅक्टेरियल आणि फंगस इन्फेक्शन पसरते. तसेच चेहऱ्यासह इतर अवयवांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्वचा विकारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चेहऱ्याचे आरोग्य कसे जपाल?
पावसाळ्यात हवेत ओलावा जास्त असतो. त्यामुळे चेहरा पुन्हा स्वच्छ करावा लागतो. याशिवाय या दिवसांत अनेक प्रकारचे संसर्ग पसरतात, त्यामुळे आजारांबरोबरच त्वचेशी संबंधित समस्याही उद्भवतात.

त्वचेच्या छिद्रात घाण अडकू नये म्हणून दिवसातून दोनतीन वेळा चेहरा धुणे गरजेचे असते. चेहऱ्यासाठी मॉईश्चरायझर आणि सनस्क्रीम वापरावी. याशिवाय त्वचेला पपईची पेस्ट लावल्यास चेहऱ्यावरील डाग व मुरुम कमी होतात.

एक लहान चमचा पाण्यात लॅव्हेंडर तेल टाकून चेहऱ्याला लावल्यास त्वचेचा तेलकटपणा कमी होतो. त्वचेची पीएच पातळी योग्य ठेवण्यास रोज रात्री अँटी-बॅक्टेरियल टोनर लावून झोपावे.

फंगल इन्फेक्शनचा वाढता प्रादुर्भाव
उन्हाळ्यात घामाने फंगल इन्फेक्शन वाढते, तसेच पावसाळ्यात त्वचा ओलसर राहिल्याने त्वचेचे आजार होतात. त्यामुळे ओले कपडे बदलणे गरजेचे आहे.

पावसाळा ऋतू त्वचेच्या आजारांसाठी अनुकूल असल्याने आधी जर फंगल इन्फेक्शन झाले असेल तर त्यांना ते पुन्हा होण्याची शक्यता असते; मात्र फंगल इन्फेक्शनवर तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय उपचार करू नयेत.

नायटा, खाज, खरुज अशा विकारांवर मेडिकलमधील स्टेरॉईड्स क्रीम वापरली जाते त्याने त्वचेची पातळी खराब होते. फंगल इन्फेक्शनसाठी त्वचा विकारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ३० ते ४० दिवसांचा क्रीम आणि औषधांचा कोर्स पूर्ण करावा लागतो. ज्यामुळे फंगल पूर्णपणे शरीरातून नष्ट होतात.

पायांची निगा राखणे आवश्यक
पावसात खूप वेळ भिजल्यामुळे पायांना बॅक्टेरियल इन्फेक्शन होते. पायांना जळजळ होण्याचा त्रास वाढतो.

ज्यांना हा त्रास आहे त्यांनी पाय व्यवस्थित पुसणे आवश्यक आहे. पायाच्या बोटांमधील ओलावा कमी व्हावा यासाठी क्रीम दिली जाते. डायबिटीस असलेल्यांना औषधे दिली जातात.

त्वचा रोगतज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा
फंगल इन्फेक्शन हा संसर्गजन्य त्वचा विकार आहे. त्यामुळे एका व्यक्तीला संसर्ग झाल्यास कुटुंबातील अन्य व्यक्तींनाही त्याचा संसर्ग होण्याची शक्यता असते.

राजावाडी रुग्णालयातील ओपीडीत येणाऱ्या ३० ते ४० टक्के रुग्णांना फक्त फंगल इन्फेक्शन असते. शिवाय त्यावरील उपचारही खर्चिक असतात. त्यामुळे यावर तात्काळ जर त्वचा विकारतज्ज्ज्ञांना संसर्ग दाखवला तर कुटुंबात पसरत नाही.

घरातील कपडे एकत्र धुतले जातात. त्यातूनही संसर्ग एकमेकांना पसरतो. अनेकदा खाज कमी झाली की फंगल इन्फेक्शन गेले असा आपला समज होतो; मात्र फंगल पूर्णपणे नष्ट होण्यासाठी २० दिवस तरी उपचार घेणे गरजेचे असल्याचे राजावाडी रुग्णालयातील त्वचा विकारतज्ज्ञ डॉ. स्वागता तांबे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Supreme Court : तुमच्याकडे कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनेकांना होणार फायदा

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

SCROLL FOR NEXT