traffic police sakal
महाराष्ट्र बातम्या

ट्रॅफिक पोलिसांना नाही गाडीची चावी काढून घेण्याचा अधिकार! जवळ ठेवा ‘ही’ कागदपत्रे

भारतीय मोटार वाहन कायदा १९३२ अंतर्गत कोणताही पोलिस अधिकारी तुम्हाला कधीही वाहनातून बाहेर काढू शकत नाहीत. तुमच्या गाडीची चावी कोणी काढून घेऊ शकत नाहीत.

तात्या लांडगे

सोलापूर : अनेकदा घाईगडबडीत ऑफिसला किंवा कोठेतरी जाताना वाहतूक पोलिस हात करून वाहने थांबवतात. गाडीची चावी काढून घेतात, जागेवरच दंड भरायला सांगितले जाते. पण, भारतीय मोटार वाहन कायदा १९३२ अंतर्गत कोणताही पोलिस अधिकारी तुम्हाला कधीही वाहनातून बाहेर काढू शकत नाहीत. तुमच्या गाडीची चावी कोणी काढून घेऊ शकत नाहीत. मोबाइलमधील डिजी लॉकरमध्ये ठेवलेली कागदपत्रे त्यांना दाखवून पुढील प्रवासासाठी वाहनचालक जावू शकतात.

चालान बुक किंवा ई-चालान जनरेटरद्वारे ट्रॅफिक पोलिस केवळ सरकारकडून जारी केलेले चालान बुक किंवा ई-चालान मशीन असतानाच कारवाई करू शकतात. घटनास्थळी असलेला पोलिस अधिकारी उपनिरीक्षक किंवा त्याहून अधिक दर्जाचा असेल तर तुम्ही घटनास्थळीच चलन भरू शकता. दुसरीकडे गाडीवर बसलेले असतानाही गाडी उचलण्याचे अनेकदा प्रकार घडतात. अशावेळी वाहन चालकांना अनेक अधिकार आहेत. त्यानुसार ट्रॅफिक पोलिसांना देखील काही मर्यादा असतात. वाहन चालकांकडे पुरेसी कागदपत्रे असतानाही कोणी जाणीवपूर्वक त्रास दिल्यास संबंधिताविरूध्द पोलिसांत तक्रार नोंदविता येते. तसेच जर ट्रॅफिक पोलिसांनी तुम्हाला थांबवले तर ते ड्रायव्हिंग लायसन्स दाखवण्यास सांगू शकतात. त्यामुळे सर्व कागदपत्रे तुमच्या कारमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पण, सरकारी डिजी लॉकर या मोबाइल अ‍ॅपमध्येही चालक कागदपत्रे डाउनलोड करुन पोलिसांना ते दाखवू शकतात.

‘डीजी लॉकर’मध्ये ठेवा ही कागदपत्रे

  • १) रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजे आरसी

  • २) पोल्यूशन अंडर कण्ट्रोल सर्टिफिकेट (पीयूसी)

  • ३) ड्रायव्हिंग लायसन्स

  • ४) वाहन इन्शुरन्स पॉलिसी

ट्रॅफिक पोलिसांनी थांबवल्यावर तुमचे अधिकार काय?

  • तुम्हाला थांबवणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाची ओळख विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे.

  • तुम्ही त्यांचा बकल नंबर किंवा नाव लिहून ठेवू शकता आणि बकल नसल्यास त्यांना ओळखपत्र विचारू शकता.

  • जर ट्रॅफिक पोलिस कर्मचारी त्यांची ओळख लपवत असल्यास तुम्ही त्यांना तुमची कागदपत्रे सादर करण्यास नकार देऊ शकता.

  • मोटार वाहन कायद्याच्या कलम १३०नुसार जेव्हा पोलिस अधिकारी तुम्हाला कागदपत्रे विचारतील, तेव्हा तुम्ही फक्त ड्रायव्हिंग लायसन्सच द्यावे.

  • जर पोलिस अधिकाऱ्याने तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स जप्त केले, तर तुम्हाला तुमच्या परवान्याविरुद्ध ट्रॅफिक पोलिस विभागाने जारी केलेली वैध पावती दिली असल्याची खात्री करा.

वाहनातून कोणीही उतरवू शकत नाहीत

भारतीय मोटार वाहन कायदा १९३२ अंतर्गत कोणताही पोलिस अधिकारी तुम्हाला कधीही वाहनातून बाहेर काढू शकत नाहीत. तुमच्या गाडीची चावी कोणी काढून घेऊ शकत नाहीत. एवढेच नाही तर ते तुमच्या कारच्या टायरची हवाही काढू शकत नाहीत. जोपर्यंत कोणीतरी गाडीच्या आत बसले आहे, तोपर्यंत तो टो करता येत नाही. पोलिसांच्या अरेरावी विरोधात तक्रार नोंदवता येते. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला योग्य वागणूक दिली गेली नाही किंवा ट्रॅफिक पोलिसांकडून छळ झाला, या घटनेची तक्रार ऑनलाइन किंवा जवळील पोलिस ठाण्यात करण्याचा अधिकार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT