IAS Pooja Khedkar esakal
महाराष्ट्र बातम्या

IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या आईने पंकजा मुंडेंच्या संस्थेला १२ लाख का दिले? पंकजांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

पूजा खेडकरचे कारनामे कमी होत नाहीत तोच तिच्या आईने मुळशीमध्ये बंदुकीचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचं प्रकरण पुढे आलं. त्यात तिच्या आई-वडिलांवर गुन्हे दाखल झाले आहेत. शिवाय पोलिसांनी तिची आई मनोरमा हिला नोटिस धाडली आहे. एवढं कमी की काय, पुण्यातल्या बाणेर भागात तिच्या आईने बोगस बांधकाम केल्याचं प्रकरण पुढे आलं. त्यामुळे मनपाने त्यांच्या घरावर नोटीस डकवली आहे.

संतोष कानडे

Pankaja Munde News : मागच्या पाच वर्षांपासून राजकीय विजनवासात गेलेल्या पंकजा मुंडेंना आता कुठे आमदारकी मिळाली आहे. विधान परिषदेवर त्यांची निवड झाली खरी परंतु त्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्याचं कारण आहे पूजा खेडकर.

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या कारनाम्यामुळे तिची वाशिमला बदली करण्यात आली. आधी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचं प्रकरण, नंतर वरिष्ठांची केबिन बळकावली, खासगी गाडीला लाल दिवा लावला.. त्यानंतर बदली झाली.

त्यानंतर मात्र पूजा खेडकरने कोट्यवधींची संपत्ती असताना बोगस ओबीसी प्रमाणपत्रावर नोकरी मिळवल्याचं प्रकरण पुढे आलं आणि सगळ्यांनाच धक्का बसला. एवढंच नाहीतर दिव्यांगाचं बनावट प्रमाणपही पूजाने मिळवल्याचं प्रकरण पुढे आलं. या सगळ्या प्रकरणाची यथोचित चौकशी करावी, अशी विरोधी पक्षाने मागणी केलीय.

पूजा खेडकरचे कारनामे कमी होत नाहीत तोच तिच्या आईने मुळशीमध्ये बंदुकीचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचं प्रकरण पुढे आलं. त्यात तिच्या आई-वडिलांवर गुन्हे दाखल झाले आहेत. शिवाय पोलिसांनी तिची आई मनोरमा हिला नोटिस धाडली आहे. एवढं कमी की काय, पुण्यातल्या बाणेर भागात तिच्या आईने बोगस बांधकाम केल्याचं प्रकरण पुढे आलं. त्यामुळे मनपाने त्यांच्या घरावर नोटीस डकवली आहे.

पूजा खेडकरच्या कुटुंबाचं आणखी एक प्रकरण पुढे येत आहे. पूजाची आई मनोरमा हिने भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या गोपीनाथ प्रतिष्ठानला बारा लाख रुपयांचा चेक दिल्याचं पुढे आलं आहे. 'इंडिया टूडे'ने हे वृत्त दिलं असून चेकचा फोटोदेखील प्रसिद्ध केला आहे.

दरम्यान, पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आणि त्यांचे बंधु माणिक खेडकर यांना भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभा किंवा राज्यसभेची उमेदवारी मिळावे असं वाटत होतं. त्यामुळेच त्यांनी मोहटादेवीला साकडे घातले होते. पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली तर देवीला दीड किलो वजनाचा चांदीचा मुकूट अर्पण करू असं ते म्हणाले होते. पंकजा यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली, तेव्हा त्यांनी आपलं नवस फेडला होता.

दिलीप खेडकर यांच्या पत्नी डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या माजी सरपंच आहेत. त्यांचे वडील देखील प्रशासकीय अधिकारी होते. भालगावमधून भाजप उमेदवार सुजय विखे यांना काही स्थानिकांनी विरोध केला होता. गावातूनच खासदाराला विरोध झाला असल्याने माणिक खेडकर यांचे तालुकाध्यपद काढून घेतले गेले अशी चर्चा होती. विखे आणि खेडकर यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यामुळेच दिलीप खेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांचा ६ लाख ११ हजार मतांनी पराभव झाला.

कोण आहे पूजा खेडकर?

पूजा खेडकर ही २०२३ च्या बॅचची आयएएस अधिकारी आहे. पुण्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून काम करत असताना पूजा काही वादांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. वादानंतर तिची वाशिम येथे बदली करण्यात आली. पूजा खेडकर अलीकडच्या काळात तिच्या मागण्या आणि कृतींमुळे चर्चेत आहे. वास्तविक, पुण्यात प्रोबेशन आयएएस अधिकारी म्हणून काम करत असताना अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप पूजावर आहे. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना मिळत नाहीत त्या सुविधांची मागणी पूजा कार्यालयात करायची. एवढेच नाही तर पूजाने तिच्या वैयक्तिक ऑडीवर लाल दिवाही लावला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT