Mumbai Rains Trains Cancelled In Maharashtra Esakal
महाराष्ट्र बातम्या

Trains Cancelled In Maharashtra: मुसळधार पावसाचा प्रवाशांना फटका! एका क्लिकवर वाचा, कोणकोणत्या रेल्वे गाड्या झाल्या रद्द

Mumbai Pune Railway Cancelletion: मध्य महाराष्ट्रात 9 ते 11 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. 8 जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टीचा अंदाज विभागाने वर्तवला आहे.

आशुतोष मसगौंडे

पुढील पाच दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती IMD ने दिली आहे. या काळात जोरदार वारे आणि गडगडाटी वादळे येऊ शकतात. तसेच मध्य महाराष्ट्रात 9 ते 11 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. 8 जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टीचा अंदाज विभागाने वर्तवला आहे.

ही परिस्थिती लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने राज्यातील काही महत्त्वांच्या मार्गावरील रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रशानसनाने अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील कल्याण आणि कसारा स्थानकांदरम्यान मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या वळवण्यात आल्या आहेत, काही गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत आणि काही गाड्यांचे प्रवासाचे मार्ग लहान करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या (सीआर) अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, वासिंद-खर्डी सेक्शनवर पहाटे 3 ते 6 दरम्यान मुसळधार पाऊस आणि पूर आल्याने ट्रॅकच्या तटबंदीचे नुकसान झाले, 'ओव्हरहेड इक्विपमेंट' खांब वाकला आणि एक झाड उन्मळून पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

गाड्यांच्या वेळा बदलल्या

म्हणाले, "कल्याण-कसारा दरम्यानची वाहतूक मर्यादित वेगाने पूर्ववत करण्यात आली आहे. ज्या गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत त्यामध्ये 16345 LTT-थिरुवनंतपुरम एक्सप्रेस, 12289 CSMT-नागपूर दुरंतो एक्सप्रेस आणि 12145 LTT-पुरी SF एक्सप्रेसचा समावेश आहे. ट्रेन क्रमांक 20705 जालना-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस आणि मनमाड-सीएसएमटी सुपर फास्ट एक्सप्रेसचा प्रवास गंतव्यस्थानापूर्वी इगतपुरी येथे संपवण्यात आला."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT