Devendra Fadnavis टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

Trambkeshwar Row: त्र्यंबकेश्वर मंदिर वादावर SITच्या अहवालाचं काय झालं? फडणवीसांनी दिलं सविस्तर उत्तर

अहवालाला उशीर का झाला? याचीही माहिती गृहमंत्र्यांनी यावेळी दिली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : त्रंबकेश्वर मंदिरात मुस्लिमांकडून धूप दाखवण्यावरुन निर्माण झालेल्या वादावर विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. पण एसआयटीच्या तपासाचं आणि अहवालाचं काय झालं? याबाबत विधान परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे. (Trambkeshwar Row What about the SIT report Fadnavis gave a detailed answer in Vidhan Parishad)

विधान परिषदेत शशिकांत शिंदे यांनी प्रश्न विचारला की, "त्रंबकेश्वर मंदिराजवळ एक दर्गा आहे. दरवर्षी या दर्ग्यात उरुस भरतो, उरुसाचे सेवेकरी मंदिराच्या दरवाजाच्या पायरीजवळ जाऊन त्रंबकेश्वराला श्रद्धेनं धूप दाखवतात व पुढे मार्गस्थ होतात. ही अशी परंपरा वर्षानुवर्षे अशीच होती का? जर अशा पद्धतीची परंपरा असेल तर या परंपरेला छेद देण्याचा प्रयत्न कोणी केला. मग मुस्लिम बांधवांनी यावरुन क्षमा मागितली. (Latest Marathi News)

त्यांची खरंच चूक होती की जाणीवपूर्वक याबाबत जातीभेद निर्माण करण्यासाठी धर्मवाद निर्माण करण्यासाठी कोणी प्रयत्न केला आहे का? तसेच असा प्रयत्न केला असेल तर संबंधितांवर तुम्ही कारवाई करणार आहात का? तसेच याबाबत जी एसआयटी नेमली आहे त्यात काय अहवाल प्राप्त झाला आहे? (Marathi Tajya Batmya)

फुटेजमध्ये भलतचं दिसून आलं

शिंदेंच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, आत्ता वादाचा भाग हा आहे की अशा प्रकारची परंपरा आहे का? याचं कारण असं की काही लोक म्हणतात ही परंपरा आहे, काहींच्या मते ही परंपरा नाही. मध्येच कोणीतरी येतं आणि अशा प्रकारे ही घटना घडवतं. त्याहीपेक्षा २०२२ मध्ये ही मिरवणूक ते दरवाजातून थेट आत घेऊन गेले तिथं ते सेल्फी काढत होते, हे फुटेजमध्ये दिसून आलं आहे.

रिपोर्ट यायचा बाकी आहे

यावर मंदिराच्या ट्रस्टीजनं तक्रार केली की, अशी कुठलीही परंपरा नाही. यामुळं आमच्या धर्मिक भावना दुखावल्या आहेत. यानंतर ही तक्रार दाखल करुन घेण्यात आली. यानंतर दोन्ही बाजूंची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी याबाबत क्षमा मागितली त्यानंतर तिथं सध्या शांतता आहे. याबाबत एसआयटी स्थापन केली होती. त्याचा रिपोर्ट अद्याप यायचा आहे. ज्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्यांना सीआरपीसी ४१ प्रमाणं नोटीस देण्यात आली आहे. त्याची पुढची चौकशी सुरु आहे.

त्यामुळं तक्रारीची दखल घेणं गरजेचं

कुठल्याही श्रद्धा आणि परंपरा पाळण्यासाठी शासनाची मनाई नाही. शासनमध्ये येणार नाही. परंतू जर एखाद्या ठिकाणी परंपरेच्या नावावर काही खोडसाळपणा होत असेल तर आपल्याला दोन्ही बाजूच्या भावना समजावून घ्याव्या लागेतील. त्रंबकेश्वरचे विश्वस्त हे जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेले असतात त्यात सरकारी लोकही असतात त्यांनी ही तक्रार दिली आहे. त्यामुळं त्याची दखल घेणं गरजेचं आहे.

रिपोर्ट कधीपर्यंत येणार

यावेळी एसआयटीचा रिपोर्ट कधीपर्यंत येईल? असा प्रश्नही विचारण्यात आला. याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, "हा रिपोर्ट महिन्याभरात मागवण्यात येईल. यासाठी वेळ यासाठी लागतात की याची पडताळणी करावी लागणार आहे. प्रथा परंपरांवर जर कोणाचा आक्षेप असेल तर सरकारनं त्याआड येण्याची गरज नाही. पण जर त्यावर कोणा एका बाजूचा आक्षेप असेल तर त्याची पडताळणी व्हायला पाहिजे"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निफ्टी आणखी 1,000 अंकांनी घसरू शकतो; शेअर बाजारात सातत्याने का कोसळत आहे?

आज नाही जन्मदिन नाही पुण्यतिथी तरीही गुगलने का बनवला सुप्रसिद्ध गायक केके यांचं डुडल ?

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

Firing On School Van: उत्तर प्रदेशात देशाला हादरवणारी घटना! स्कूल व्हॅनवर तरुणांकडून गोळीबार

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर ‘वंचित’ मतांमध्येही आघाडी घेणार का?

SCROLL FOR NEXT