मुंबई- महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाच्या प्रवक्तेपदी तृतीयपंथीयाची निवड करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्तेपदी तृतीयपंथी कवयित्री दिशा पिंकी शेख यांची निवड करण्यात आली आहे.
शिवाजी पार्क येथे 23 फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृतरित्या ही घोषणा करण्यात आली आहे. एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्त होणाऱ्या दिशा शेख या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी प्रवक्त्या आहेत.
आवाज नसलेल्या तृतीयपंथी समुदायाच्या व्यक्तीला थेट आपल्या पक्षाचाच आवाज बनविणे, हे भारतातील खऱ्या अर्थाने वंचितांचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकरच करु शकतात. मी आणि आमचा तृतीयपंथी समुदाय यासाठी बाळासाहेबांचा ऋणी आहे, अशा शब्दांत दिशा शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, आतापर्यंत आमच्या समुदायातील काही व्यक्ती आमदार, खासदार झाल्या. मात्र आम्हां तृतीयपंथियांवरील अन्यायाचा आवाज संसदेपर्यंत कधी पोहोचलाच नाही. वंचित बहुजन आघाडीने आम्हांलाच आवाज बनविले ही आम्हां समस्त तृतीयपंथियांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचा प्रवक्ते म्हणून दिलेली संधी आम्हां तृतीयपंथियांसाठी नवचैतन्य निर्माण करणारी आहे. यामुळे आम्ही निश्चितच समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ. हेटाळणीचे सूर आता कौतुकाचे बोल बोलू लागतील हा आशावाद देखील पिंकी शेख यांनी यावेळी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.