trap was set Ayodhya visit mns raj thackeray loudspeaker protest will continue pune  Sakal
महाराष्ट्र बातम्या

दौऱ्यात अडकाविण्यासाठी सापळा रचला - राज ठाकरे

‘‘अयोध्या दौऱ्यात मला अडकविण्यासाठी सापळा रचला होता. त्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरविली होती,’’

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘अयोध्या दौऱ्यात मला अडकविण्यासाठी सापळा रचला होता. त्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरविली होती,’’ असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केला. भोंग्यांसंदर्भातील आंदोलन यापुढेही सुरू राहणार आहे, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.‘मनसे’च्या वतीने आयोजित सभेत राज ठाकरे बोलत होते. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अयोध्या दौरा रद्द करण्यामागचे कारण, परप्रांतियांविरोधामागील आंदोलनाची भूमिका, भोंगे आंदोलनाची पुढील दिशा सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपवरही ठाकरे यांनी निशाणा साधला. माझ्या पायाचे दुखणे सुरु असून कमरेलाही त्रास होतोय. एक तारखेला शस्त्रक्रिया करणार आहे. शस्रक्रिया झाल्यानंतर दोन-तीन आठवड्यानंतर मी पुन्हा आपल्याशी संवाद साधणार आहे, असेही ते म्हणाले.

ठाकरे म्हणाले, ‘‘अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर मुंबई, दिल्ली, उत्तरप्रदेश येथून मला माहिती मिळत होती. मी हट्टाने अयोध्येला जायचे ठरवले असते तर हजारो मनसेचे सैनिक माझ्याबरोबर आले असते. तिथे जर काही झाले असते तर त्यांच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. त्यांच्या मागे ससेमिरा लागला असता. मला त्या सापळ्यात अडकायचे नव्हते. दौरा रद्द केल्याने माझ्यावर झालेली टीका सहन करायला मी तयार आहे, पण कार्यकर्ते मी अडकू देणार नाही. ज्यांना अयोध्यावारी खुपली होती, त्यांनीच हे सगळं केलं होतं.’’

‘‘मी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. आता १२-१४ वर्षांनंतर त्यांना जाग आली का?, यातून चुकीचे पायंडे पडत आहेत. विषय माफी मागण्याचाच आहे ना, मग गुजरातमधून यूपी-बिहारच्या सुमारे १५ हजार लोकांना हाकलून दिले. गुजरातमध्ये कोणाला माफी मागायला लावणार?,’ असा सवाल ठाकरे यांनी केला.

राणा दांपत्यावर निशाणा

राणा दांपत्यावर ठाकरे यांनी यावेळी निशाणा साधला. ‘‘मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणायला जाणार होते. मातोश्री काय मशीद आहे काय? या प्रकरणावरून मोठा गोंधळ, आरोप-प्रत्यारोप झाले. एवढा गोंधळ होऊन संजय राऊत आणि राणा दांपत्य लडाखमध्ये एकत्र जेवताना दिसले. हे सगळे ढोंगी आहेत.

शरद पवार यांच्यावर टीका

सभेसाठी हॉल परवडत नाही. त्यामुळे मैदानावर सभा घ्यायचे ठरले. त्यासाठी एसपी कॉलेजला विचारले. मात्र त्यांनी सभेला मैदान देण्यास नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही. नदीकाठी सभा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र पावसाचे वातावरण. पावसात भिजून भाषण करावे म्हटले, पण निवडणुका नाही. उगाच कशाला भिजत भाषण करता, अशा शब्दांत ठाकरे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीका मारला.

शिवसेनेवर टीका

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणाचा वापर शिवसेनेकडून केवळ राजकारणासाठी होत असल्याची टीका करत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT