पुणे : रवी राणा आणि नवनीत राणा हे सध्या तुरुंगात आहेत. परंतु पहिल्याच दिवशी नवनीत राणांनी असे आरोप केले, की मला जातीवाचक शद्ब वापरले गेले. मला वाॅशरुमला जाऊ दिले गेले नाही. मला पाणी पिऊ दिले गेले नाही. अहो पहिल्याच दिवशी अशा पद्धतीने पोलिस का वागतील? तुम्हाला जर चार-पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असती किंवा तुम्हाला कारागृहात तीन-चार महिने राहावं लागल असतं. मग तुमच्यावर असं काही तर झालं असतं तर लोकांना थोडं फार विश्वास तरी वाटलं असत. तुम्ही पहिल्याच दिवशी दोन-तीन तासांमध्ये तुमच्याबरोबर असं कोणी काही करणार नाही. आणि तुम्हाला राष्ट्रपती राजवट लागावी आणि भाजप समर्थक म्हणून तुम्ही जे काही भूमिका घेत आहात. त्यासाठी तुम्हाला खोटं सांगावं लागतयं, अशी घणाघाती टीका भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी आज बुधवारी (ता.२७) नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर केली. (Trupti Desai Allegation On Rana Couple, Says They Done Stunt For Minister Post)
मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी व्हिडिओ ट्विट केलाच. परंतु समजा हा जर पुरावा नसता तर नक्कीच पोलिसांना बदनाम करण्याचा हा मोठा डाव होता. परंतु पोलिसांना बदनाम करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. नवनीत राणांना मला आवर्जून सांगायचं, की तुम्ही जेव्हा अमरावतीतून अपक्ष खासदार झालात ना मला तेव्हा एक महिला खासदार निवडून आल्याच आम्हाला खूप मोठा आनंद झाला होता. परंतु परवा पोलिस तुम्हाला ताब्यात घ्यायला आले, तेव्हा ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधी असल्याचा माज दाखवत होता, ते मात्र अजिबात बघण्यासारखं नव्हतं. हा माज जर असाच ठेवला, तर तुम्ही ज्यांचे प्रतिनिधित्व करताय ते सर्वसामान्य तुम्हाला साथ देतील का मला माहित नाही. पण अशी म्हणायची वेळ आलेली आहे, की खासदार आडसूळ साहेबच खूप चांगल्या पद्धतीने काम करत होते.
आणि पोलिसांबद्दल गैरसमज पसरवायचे, आयुक्तांची चौकशी लावायची. लोकसभेच्या सभापतींना पत्र लिहायचं म्हणजे तुम्हाला नेमकं इथली परिस्थिती अस्थिर करायची आहे ना? तुम्हाला राष्ट्रपती राजवट लागूच करायची आहे ना ? तुम्ही खरी परिस्थिती सांगा ना. खरे मुद्दे सांगा ना, तुम्हाला अडवला कोणी? परंतु खोटं काही तरी सांगून किंवा खोट काही तरी कुंभाड रचून षडयंत्र करत असाल तर ते कधीच सफल होणार नाही. तुमचे आंदोलन हे सर्व राजकीय स्टंट आहे. कारण मंत्रीपदासाठी हे सर्व चाललं आहे किंवा भारतीय जनता पक्षासाठी काही केल तर केंद्रात मंत्रिपद मिळू शकते. किंवा पुन्हा राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेत आली तर रवी राणांना तरी मंत्रीपद मिळू शकते. पण मला आवर्जून पोलिसांविषयी हे सांगायच की पोलिसांच्या ताब्यात जेव्हा आपण जातो. मी अनेक आंदोलने केली आहेत. अनेक वेळा पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले आहे. कायदा आम्ही मोडला. आम्हाला नोटीसा दिले गेले आम्ही ते ऐकलं नाही. मग पोलिस ताब्यात घेणारचं. परंतु ताब्यात घेतल्यानंतर सुद्धा पोलिस काळजी घेतात, असं देसाई म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.