राज्यात पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात भूकंपाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीमधील बडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा गोप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
उदय सामंत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना म्हणाले की, ठाकरे गटात उरलेले १३ आमदार देखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे २० लोकं देखील एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत अशी देखील चर्चा आहे. तसेच काँग्रेसचे बडे नेते काल महाबळेश्वर येथे शिंदेंना भटले ही देखील चर्चा आहे. चर्चा भरपूर राहू शकतात पण ते सत्यात उतरलं पाहिजे असं सूचक विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.
हेही वाचा - Types of Vedas: वेदांचे प्रकार
राज्यात सध्या मोठ्या उलथापालथ होणार असल्याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेलेले अनेक अमदार पुन्हा ठाकरेंच्या गटात परत येणार असल्याची चर्चा सुरू आहे. यादरम्यान आता उदय सामंत यांनी केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा नव्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान राज्यात मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलणार अशा चर्चा सुरू आहेत. यामध्ये अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्या. शिवाय अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्रीपदासाठी आपण आजही तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा नाव समोर आलं.
चर्चेत सुरुवातीला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची नाव होती. मात्र आता या रस्सीखेचमध्ये आणखी काही नाव समाविष्ट होत असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांच नावही समोर आलं आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत विधान केलं असून विखेंनी मुख्यमंत्री व्हावं का, असा प्रश्न विचारला असता, सत्तार म्हणाले की, मित्र मोठा व्हावा असं कोणाला वाटत नाही? विखे पाटील यांनी मुख्यमंत्री पदापेक्षाही मोठा व्हावं. मी जर हनुमानासारखा मोठा भक्त असतो, तर माझी छाती फाडून दाखवलं असतं की, माझ्या हृदयात विखे पाटीलच आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.