uday samant sakal
महाराष्ट्र बातम्या

सेनेला कुबड्यांची गरज नाही: मेळाव्यात फुंकले निवडणुकांचे रणशिंग

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज (कोल्हापूर) : आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रत्येक राजकीय पक्ष स्वबळाची भाषा करीत आहे. मग आम्ही कशाला आघाडी करून लढायचे. आम्हीसुद्धा स्वबळावरच लढण्यास सज्ज आहोत. गडहिंग्लज (Gadhinglaj)पालिकेच्या सर्व १९ जागा स्वबळावर लढवून कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात शिवसेनेला कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही, हा संदेश इथल्या शिवसैनिकांनी संपूर्ण जिल्ह्याला द्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी येथे केले.

गडहिंग्लजला आयोजित शहरप्रमुख संपर्क कार्यालय उद्‍घाटन आणि नामफलक अनावरण मंत्री सामंत यांच्या हस्ते झाले. यानिमित्त शिवसेनेतर्फे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, प्रा. सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर, रियाज शमनजी, राजेखान जमादार, प्रभाकर खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटणे गल्लीत हा मेळावा झाला. देवणे यांनी शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, रिंगरोडला निधी, बेघरांची घरे नियमितीकरण करणे, सिग्नल यंत्रणा व नूलमध्ये संस्कृत विद्यापीठ आदी विकासकामे मार्गी लावण्याची मागणी केली. या वेळी मराठी उद्योजकांचा सत्कार झाला.

मंत्री सामंत म्हणाले, ‘‘पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज नारळच फोडला आहे. देवणे यांनी सुचवलेली सर्व कामे पूर्ण करण्याची जबाबदारी संपर्कमंत्री म्हणून माझी आहे. विकासाची चिंता आता करू नका. नागरिकांनी पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे. विकासातून राज्यातील एक आदर्श शहर बनवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. निवडणुकांमध्ये विरोधकांवर टीका करण्यापेक्षा शिवसेनेने काय केले आणि पुढे काय करणार आहे, याची माहिती घरोघरी जाऊन द्यावी. शहरासाठीच्या विविध कामांच्या मागणीमुळे सत्ताधारी लोकांनी आतापर्यंत काय केले, असा प्रश्‍न पडतो. याचा जाब आता नागरिकांनी निवडून दिलेल्यांना विचारावे. येणाऱ्या निवडणुकांना शिवसैनिकांनी संघटितपणे सामोरे जावे. यामुळे घराघरांत जाऊन शिवसेनेची भूमिका आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे काम पोहोचवा. नक्कीच जनता शिवसेनेच्या मागे उभी राहील.

शिवसेना नेहमी मराठी लोकांच्यामागे उभी राहिली आहे. यामुळे सीमाभागातील मराठी तरुणांसाठी कौशल्य विकास केंद्र, विद्यापीठाचे विस्तार केंद्र सुरू करणारे शिवसेना एकमेव आहे. मोदींसारखे उद्धव ठाकरे केवळ घोषणा करत नाहीत, तर प्रत्यक्ष कृती करतात. आतापर्यंतच्या अनेक कामांतून ठाकरे यांनी हे सिद्ध करून दाखविले आहे.’’

संपर्कप्रमुख दुधवडकर यांनी पालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे आणि शहर विकासाच्या स्वप्नपूर्तीसाठी जनतेने शिवसेनेच्या पाठीशी राहावे, असे आवाहन केले. शहरप्रमुख संतोष चिक्कोडे यांनी प्रास्ताविकात पालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असून, पालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले. धर्मवीर क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. संभाजी भोकरे, विद्या गिरी, दिनेश कुंभीरकर, संज्योती मळवीकर, सौ. जाधव, सागर कुराडे, वसंत नाईक, प्रतीक क्षीरसागर, अवधूत पाटील, अकलाख मुजावर उपस्थित होते. तालुकाप्रमुख दिलीप माने यांनी आभार मानले.

शिवसेनेचे नव्हे, त्यांचेच नुकसान

मंत्री सामंत म्हणाले, ‘‘येणाऱ्या निवडणुकांत शिवसेनेला सोबत घेतले, तर शिवसेनेचेच नुकसान होणार असल्याचे काही पक्षांचे नेते सांगताहेत. परंतु, शिवसेना सोबत नसेल तर उलट त्यांचेच नुकसान होणार आहे, हे त्यांना अजून कळालेले नसावे. राज्यभर यापेक्षा अधिक गतीने शिवसेना भविष्यात मुसंडी मारणार आहे, हे त्या नेत्यांनी ध्यानात ठेवावे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा ३१६५१ मतांनी विजयी

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Tanaji Sawant won Tuljapur Assembly Election Result 2024 : राणाजगजितसिंह पाटील यांच्या पदरी 'जीत', तुळजापूरमध्ये कमळ फुलले

Miraj Assembly Election 2024 Results : मिरज मतदारसंघात सुरेश खाडेंनी ठाकरे गटाच्या तानाजी सातपुतेंवर 44,706 मतांच्या फरकाने केली मात

SCROLL FOR NEXT