Uday samant Meet sharad pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : उद्योगमंत्री उदय सामंत शरद पवारांच्या भेटीला; भेटीचं कारण आलं समोर...

संतोष कानडे

मुंबईः राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे मुंबईत शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. दोघांमध्ये राजकीय विषयावर चर्चा होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात उलटसुलट घडामोडी घडत आहेत. त्या अनुषंगाने ही बैठक होतेय का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होतेय.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषद तसेच इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी ही भेट होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र या भेटीत राजकीय चर्चा होऊ शकतात, असं बोललं जात आहे.

२ जुलै २०२३ रोजी अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड करत सत्तापक्षाला समर्थन दिलं. त्यानंतर अजित पवारांसोबत ३५ पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं जातं. मात्र दोन्ही गटाकडून अद्याप कुणाकडे किती संख्याबळ आहे, हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. शिवाय पक्षात फूट पडलेली नसून काही लोकांनी वेगळी भूमिका घेतलीय; असं शरद पवार म्हणतायत.

अजित पवारांनी सत्तापक्षाला समर्थन दिल्यामुळे तेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील, असं राजकीय जाणकर सांगतात. शिवाय अजित पवार गटाचे नेतेदेखील त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल आशावादी आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गट अस्वस्थ असणं स्वाभाविक आहे. त्यासाठी ही भेट आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT