Udayanaraje Bhosle On Wagh Nakh Video 
महाराष्ट्र बातम्या

Video : औरंगजेब की अफजल खान? वाघनखांवर बोलताना भरकटले उदयनराजे, भाषणात केली 'ही' चूक

रोहित कणसे

छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर केलेल्या शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे साताऱ्यात दाखल झाली आहेत. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये ही वाघनखं पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. या वाघनखांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कऱण्यात आले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले हे देखील उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमात वाघनखांबद्दल बोलताना उदयनराजेंचा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

प्रतापगडावर अफझल खानाचा वध करताना शिवाजी महाराजांनी जी वाघनखं वापरली त्या वाघनखांबद्दल बोलताना उदयनराजेंनी औरंगजेबाचा दाखला दिला. उदयनराजे बोलताना म्हणाले की, इथं आणल्यानंतर त्या वाखनखांकडं फक्त वाघनखं म्हणून पाहू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस स्वतःचा जीव धोक्यात घातला... त्यांनी जीवाची पर्वा न करता कारण की औरंगजेबासमोर... यांचं फारसं काय... त्यांची उंचीपण तेवढी नव्हती. पण त्यावेळेस त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून संपूर्ण.... फक्त एकच त्यांच्यासमोर विचार होता की लोकांचं भलं व्हावं.... माझा जीव गेला तरी चालेल. त्यामुळं अशा एका व्यक्तीच्या बाबतीत वाखनखं इथं आणली जातात, तेव्हा त्याचं पूजन करण्याऐवजी वाद विवाद कृपया करुन कोणी निर्माण करु नये, असं आवर्जून संबंधीत लोकांना सांगावं वाटतं असे उदयनराजे म्हणाले.

लंडनहून आलेली ही वाघनखे मुंबईहून साताऱ्यात विशेष सुरक्षेत आणण्यात आली. ही वाघनखे साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील सुरक्षा पेटीत ठेवण्यात आली आहेत. या वाघनखांच्या सुरक्षिततेसाठी बुलेट प्रूफ काचपेटी, तसेच मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, लेसर सेंसर आदी यंत्रणा लावण्यात आल्या आहेत. यासोबतच पोलिस व बाहेरच्या एजन्सीकडे सुरक्षिततेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही वाघनखे सात महिने सातारकरांना पाहता येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील शौर्याचे प्रतीक असलेली ऐतिहासिक वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियममधून तीन वर्षांसाठी भारतात आणली आहेत. उद्या म्हणजेच शनिवारपासून (ता. २०) हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे.

व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियमच लंडनचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम प्रमुख निकोलास मर्चंड हे देखील सोबत असतील. या वाघनाखांसोबत ब्रिटनच्या म्युझियममधील एक केअर टेकर आला असून, तो वाघनखांची सर्व ती काळजी घेणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT