खासदार उदयनराजे भोसले आज मोठी घोषणा करणार आहेत.
सातारा : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आज मोठी घोषणा करणार आहेत. त्यामुळं ते काय घोषणा करणार याची जास्तच उत्सुकता ताणली, असली तरी उदयनराजेंच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर आणि फेसबुकवरती जी मोठ्या घोषणेची पोस्ट करण्यात आली होती. ती डिलिट (Delete) करण्यात आलीय, त्यामुळं उदयनराजे आज मोठी घोषणा करणार की, नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
साताऱ्याचे उदयनराजे भोसले हे राज्यसभेचे खासदार आहेत. ते आजच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक मोठी घोषणा करणार आहेत, असं त्यांनी काल (बुधवार) पत्रक प्रसिद्ध केलं होतं. साताऱ्यातील गांधी मैदानावर आज 6 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात येणार असल्याचंही त्यात म्हंटलं होतं. या पत्रकात त्यांनी एक अभिनव उपक्रम सुरू करणार असल्याचंही सांगितलं होतं; पण नेमक काय केलं जाणार आहे, याची उत्सुकता सर्वांना लागलीय. परंतु, काल उदयनराजेंच्या ट्विटर हॅंडलवर आणि फेसबुकवरती जी मोठ्या घोषणेची पोस्ट करण्यात आली होती. ती डिलिट करण्यात आल्याने तर्कविर्तक लढवले जात आहेत.
पत्रकात म्हंटलंय की, राजकीय आरोप-प्रतिआरोपांच्या या वातावरणात पहिल्याच वाक्यानं ज्या-ज्या शक्यता तुमच्या डोक्यात आल्या असतील, त्यामधले काहीच नसणार आहे. उपक्रम अभिनव आहे, तेव्हा हे आमंत्रण पण फार औपचारिक अशा धाटणीचं नाही. आपण सारेच आपल्या भोवती सुरूअसणाऱ्या घटना पाहत असतो. काही अयोग्य वाटल्या तर त्या कोणीतरी दुरुस्त करेल अशी केवळ इच्छा आपण व्यक्त करत असतो. आम्ही मात्र एका सामाजिक प्रश्नावर गेली अनेक वर्षे प्रशासकीय बदलांसाठी अनेक प्रयत्न केले; पण ते पुरेसे नाहीत. गेल्या काही दिवसांच्या चिंतनातून आम्ही या प्रश्नाचे उत्तर म्हणून स्वतःच एक व्यवस्था उभी करण्याचं ठरविलंय.
ते पुढे सांगतात, कोणता प्रश्न, काय व्यवस्था अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी आम्ही आपणांस सदर पत्रानं आमंत्रण देत आहोत, असं सांगत त्यांनी घोषणेबाबत गूढ कायम ठेवलंय. त्यामुळं ते आज काय बोलणार आणि काय घोषणा करणार याचीच साताऱ्यात जोरदार चर्चा सुरुय. मात्र, याबाबतचं कालचं (बुधवार) ट्विट ट्विटर हॅंडल आणि फेसबुकवरती शेअर केलेलं हे पत्र आज डिलिट झाल्याचं दिसतंय, त्यामुळं उदयनराजे आजची मोठी घोषणा करणार की, नाही याची उत्सुकता सर्वांना लागून राहिलंय. आज साताऱ्यातील गांधी मैदानावर 6 वाजता घोषणाचा कार्यक्रम होणार असल्याची पोस्ट काल उदयनराजेंच्या ट्विटर हॅंडलवरुन शेअर करण्यात आली होती. दरम्यान, त्यांच्या निकटवर्तीयांशी संपर्क साधला असता, त्यांनी हा कार्यक्रम हाेणारच असल्याचे सांगितले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.