Udayanraje Bhosale vs BhagatSingh Koshyari esakal
महाराष्ट्र बातम्या

शिवरायांचे रामदास कधीच गुरु नव्हते, हाच खरा इतिहास : उदयनराजे

सकाळ डिजिटल टीम

समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल, असं वक्तव्य राज्यपालांनी केलं होतं.

सातारा : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी समर्थ रामदास स्वामी (Samarth Ramdas Swami) यांच्याशिवाय शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांना कोण विचारेल, असं वादग्रस्त वक्तव्य केलंय. यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळं नव्या वादाला सुरुवात झालीय. भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना हे वक्तव्य केलंय. या वादग्रस्त विधानावर आता साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय.

खासदार उदयनराजेंनी ट्विटव्दारे राज्यपालांवर निशाणा साधलाय. ते म्हणाले, राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या, तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबादमधील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून एकप्रकारे महाराजांचा अपमानच केलाय. त्यामुळं शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवं होतं. त्यांच्या वक्तव्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत, तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपलं वक्तव्य त्वरित मागं घ्यावं, असं आवाहन वजा इशारा उदयनराजेंनी राज्यपालांना दिलाय.

छ. शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणाले होते कोश्यारी?

औरंगाबादमधील (Aurangabad) एका कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी म्हणाले, महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागं आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की, तुमच्या कृपेनं मला राज्य मिळालं आहे. आता या देशाची परंपरा आहे, गुरू आहे तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते. त्यामुळं मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराज समर्थांना म्हटले; पण समर्थांनी ती चावी घेतली नाही. समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचं सांगितलं. हा भाव अशा सद्गुरूकडे मिळतो, असंही कोश्यारी म्हणाले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT