महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे सत्तारांच्या वक्तव्यावर आक्रमक; ...तर चौथी घंटा वाजायला लागेल

सकाळ डिजिटल टीम

शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्द काढले. सत्तारांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यभर वाद पेटलेला दिसून आला. या वादात आता ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उडी घेतलीय. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा तिखट शब्दांत टीका करण्यात आली आहे.

महिलांचा सन्मान नाही, महाराष्ट्राच्या संस्कृतीची कदर नाही. महानाट्यवाल्यांचे सरकार सर्वत्र 'तिसरा अंक करीत धिंगाणा घालीत सुटले आहे. या धिंगाण्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कमरेचे सुटले, पण देवेंद्र फडणवीस यांचा अगतिक धृतराष्ट्र का झाला आहे? चित्रा वाघ यांनी संजय राठोड या मंत्र्याविरुद्ध फोडलेली डरकाळी तरी त्यांच्या कानावर जाऊ द्या. सत्तार, राठोड, गुलाब पाटील, रवींद्र चव्हाण या नट मंडळींचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान, सन्मान नाही. या मंत्र्यांना हाकला, नाहीतर महानाट्याची चौथी घंटा वाजायला लागेल. रंग तसेच दिसत आहेत!

सामनाच्या अग्रलेखातून 'मुख्यमंत्र्यांच्या महानाट्यातील अब्दुल सत्तार, गुलाब पाटलांसारख्या नट मंडळींच्या झोकांड्या जाताना पाहून महाराष्ट्राची सुसंस्कृत रसिक जनता जोडेफेक करू लागली आहे. हे कसले महानाट्य? हा तर महाराष्ट्राच्या माथी दिल्लीने मारलेला महादळभद्री प्रयोग आहे . या नट मंडळींचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान, सन्मान नाही. या मंत्र्यांना हाकला, नाहीतर महानाट्याची चौथी घंटा वाजायला लागेल,' अशा शब्दात टीका केली आहे.

अब्दुल सत्तार हा काही महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा समाजकारणात दखल घ्यावी असा माणूस नाही. मराठवाड्यातील सिल्लोडचा हा बेडूक इकडून तिकडे सोयीनुसार उड़बा मारतो. सोयीनुसार डराव डरावही करतो. त्याच्या तोंडातून नेहमीच गटाराचा मैला वाहत असतो. महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेस ते शोभणारे नाही. या अब्दुल सत्तार यांच्या एका गलिच्छ, बेशरम वक्तव्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या व शरद पवार यांच्या सुविद्य कन्या सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना या अब्दुल्लाने आपल्या तोंडाचे गटार असे उघडले की, त्यातून फक्त दुर्गंधीच बाहेर पडली.

अब्दुल सत्तार हे मिंधे गटाचे जाणते सरदार असून त्यांच्या अंगावर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कृषी मंत्रीपदाची झुल टाकली आहे. सध्या अतिवृष्टीमुळे राज्यात शेतीची अवस्था दारुण आहे. अशा वेळी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी हा माणूस आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे अशांवर बेताल वक्तव्य करीत सुटला आहे. सुप्रिया सुळे यांच्याबाबत सत्तार यांनी ज्या शिवराळ भाषेचा वापर केला तो सर्व प्रकार महाराष्ट्राच्या प्रतिमेस काळिमा फासणारा आहे. सुप्रियांवर सत्तारांचे बेताल वक्तव्य समोर येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चिडले. त्यांनी सत्तारांच्या मुंबईतील सरकारी बंगल्याची तोडफोड केली. हा बंगला मंत्रालयासमोर आहे. सत्तार यांच्या संभाजीनगर येथील घरावरही लोकांनी दगड मारले. राज्यात ठिकठिकाणी सत्तार यांच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत. त्यांचे पुतळे जाळून, पुतळयास जोडे मारून लोक आपला संताप व्यक्त करीत आहेत. सवित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ अशा महान स्त्रीयांचा वारसा सांगणारे हे महाराष्ट्र राज्य आहे.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काय लायकीचे लोक भरले आहेत ते यामुळे दिसले. जळगावचे खोकेबाज 'टाईट' मंत्री गुलाबराव पाटील यांचाही फक्त तोलच गेला नाही तर ते झोकांड्या जाताना दिसत आहेत. शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांचा उल्लेख या खोकेबाज गुलाबरावाने 'नटी' म्हणून केला. 'नटी' हा शब्द त्यांनी कोणत्या अर्थाने वापरला? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे हे नटवर्य प्रशांत दामले यांच्या एका नाट्य प्रयोगासाठी गेले. त्या वेळी त्यांच्यासोबत इतर दोन 'नटसम्राट' होते. मुख्यमंत्री म्हणाले, “या नाटकाचे काय घेऊन बसलात? आम्ही महाराष्ट्रात तीन महिन्यांपूर्वी एक महानाट्य घडवलं. त्यामुळे लोक आश्चर्यचकित झाले. त्या महानाट्याचे पडसाद आजही उमटत आहेत.” मुख्यमंत्री बरोबर बोलले. त्यांच्या महानाट्यातील अब्दुल सत्तार, गुलाब पाटलांसारख्या 'नट' मंडळींच्या झोकांड्या जाताना पाहून महाराष्ट्राची सुसंस्कृत रसिक जनता जोडेफेक करू लागली आहे. तिकडे रवींद्र चव्हाण हे मिंधे मंत्रिमंडळातील एक मंत्री भायखळा पोलीस स्टेशनात जाऊन एका बलात्कारी गुन्हेगारास वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा राजीनामाच घ्यायला हवा. हे कसले महानाट्य? हा तर महाराष्ट्राच्या माथी दिल्लीने मारलेला महादळभद्री प्रयोग आहे.

महिलांचा सन्मान नाही, महाराष्ट्राच्या संस्कृतीची कदर नाही. महानाट्यवाल्यांचे सरकार सर्वत्र 'तिसरा अंक करीत धिंगाणा घालीत सुटले आहे. या धिंगाण्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कमरेचे सुटले, पण देवेंद्र फडणवीस यांचा अगतिक धृतराष्ट्र का झाला आहे? चित्रा वाघ यांनी संजय राठोड या मंत्र्याविरुद्ध फोडलेली डरकाळी तरी त्यांच्या कानावर जाऊ द्या. सत्तार, राठोड, गुलाब पाटील, रवींद्र चव्हाण या नट मंडळींचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान, सन्मान नाही. या मंत्र्यांना हाकला, नाहीतर महानाट्याची चौथी घंटा वाजायला लागेल. रंग तसेच दिसत आहेत!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT