Shivsena Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: काय होणार? उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे पहिल्यांदाच येणार आमने-सामने!

सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशनाच्या माध्यमातून शिवसेनेच्या दोन्ही गटाचे नेते आमने-सामने

सकाळ डिजिटल टीम

नागपूरमध्ये उद्यापासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांनी या अधिवेशसाठी विशेष तयारी केली आहे. सरकारला कोंडीत पडकण्यासाठी विरोधकांकडे वेगवेगळे मुद्दे आहेत. या हिवाळी अधिवेशनाची संपूर्ण तयारी झाली आहे. विविध मुद्यांवरुन हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशातच राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून शिवसेनेच्या दोन्ही गटाचे नेते म्हणजेच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमने-सामने येण्याची शक्यता आहे. नागपुरमध्ये होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे समोरासमोर येण्याची शक्यता आहे. नागपुरमध्ये उद्यापासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होत आहे. या अधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती एका खासगी वृत्तवाहिनीने दिली आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर दोन वाजता विरोधी पक्षांची पत्रकार परिषद होणार आहे. तर आज संध्याकाळी साडेपाच वाजता कॅबिनेटची बैठक पार पडणार आहे. तर आज संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे. दरम्यान, सायंकाळी पाच वाजता चहापानाचा कार्यक्रम होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT