MLA Disqualification Case 
महाराष्ट्र बातम्या

MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेप्रकरणी आज सुनावणी; राहुल नार्वेकर निर्णय देणार की पुन्हा तारीख पे तारीख...

Sandip Kapde

MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेप्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. आज (गुरुवार) दुपारी चार वाजता विधनभवनात सुनावणी होणार आहे. ३४ याचिकांचे ६ गट तयार करण्यात आले. त्यानुसार गटानुसार आता सुनावणी होणार आहे.

आज महत्वाची सुनावणी होणार आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांना जी कागदपत्रे सुप्रीम कोर्टात सादर केले होते. ती कागदपत्रे लवकर सादर करा, असे आदेश राहुल नार्वेकर यांनी दिले होते. ही कागदपत्रे दोन्ही गटाकडून जमा करण्यात आली.

नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शिवसेनेला आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी गटाला विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात सर्वोच्च न्यायालयात दिलेले कागदपत्र जमा करण्यासाठी २५ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत काल संपली.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने यापूर्वी सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी केली होती जेणेकरून कार्यवाही लवकर पूर्ण करता येईल. मात्र, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने या मागणीला विरोध करत याचिकांवर स्वतंत्र सुनावणी करण्याचा आग्रह धरला. मात्र राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाची मागणी मान्य केली. तसेच गेल्या मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना अपात्रतेच्या याचिकांवर त्वरीत निर्णय घ्यावा, असे म्हटले होते.

शिंदे आणि त्यांच्याशी निष्ठावान असलेल्या अनेक आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकांवर निर्णय घेण्यास झालेल्या विलंबाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी नार्वेकरांवर जोरदार टीका केली होती. विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे आदेश झुगारू शकत नाहीत, असे न्यायालयाने म्हटले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT