Uddhav Thackeray News 
महाराष्ट्र बातम्या

Shivsena News: ठाकरेंचा बंगला असणाऱ्या गावच्या ग्रामपंचायतीतील 'ती' कागदपत्रे गायब; किरीट सोमय्यांचा दावा खरा ?

Shivsena News: ठाकरे यांच्या मालकीच्या कथित बंगल्याच्या प्रकरणाला नवं वळण

धनश्री ओतारी

Shivsena News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या मालकीच्या कथित बंगल्याच्या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. कोर्लई ग्रामपंचायतीमधील जून २०११ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत झालेल्या मासिक सभेचे इतिवृत्त आणि महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांचा दावा खरा ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Uddhav Thackeray Bungalow Case Important documents missing )

मिळालेल्या माहितीनुसार, गहाळ झालेल्या कागदपत्रांचा शोध घेण्यासाठी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन ग्रामपंचायतीचे दप्तर शोधण्यात येत होती.Uddhav Thackeray

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मुरुड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. रायगड जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे कोर्लई ग्रामपंचायतीच्या कागदपत्राची तपासणी करण्यात गर्क झालेले आहेत. Uddhav Thackeray

या गहाळ कागदपत्रांमुळे ठाकरे यांच्या मालकीच्या कथित बंगले प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

नेमकं काय प्रकरण आहे?

अलिबाग येथील अन्वय नाईक यांच्याकडून उद्धव ठाकरे यांनी साडेनऊ एकर जमीन आणि त्यावरील 19 बंगले 2013 साली विकत घेतले.

३ एप्रिल 2014 रोजी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे पार्टनरशिपमध्ये जमीन आणि बंगले घेण्यात आले आणि ही प्रॉपर्टी नावे करण्यासाठी ग्रामपंचायतीला पत्रे देखील देण्यात आली. एक एप्रिल 2013 ते 31 मार्च 2021 पर्यंत 21 बंगल्यांची घरपट्टी ठाकरे यांनी स्वतःच्या खात्यामधून भरली.

उद्धव ठाकरेंनी निवडणुकीत जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्यात सदर जमीन दाखवण्यात आली. मात्र बंगले दाखवण्यात आले नाहीत यावरच किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला.

किरीट सोमय्या यांचा असा आरोप आहे की त्यांच्या तक्रारीनंतर स्थानिक ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे यांनी दडपण आणून 19 बंगल्यांच्या रेकॉर्डवर खाडाखोड केली आणि बंगले गायब केले.Uddhav Thackeray

किरीट सोमय्यांचे आरोप

किरीट सोमय्या यांचा असाही आरोप आहे की 2008 मध्ये या जागेवर ग्रामपंचायतीने बंगले बांधल्याचं सर्टिफिकेट दिलं असताना शिवाय त्याचा टॅक्स भरला जात असताना अचानक 2022 मध्ये रेकॉर्ड मध्ये बंगलेच नाहीत असं कसं काय दाखवता येतं.

आजची या बंगल्यांची रेडी रेकनर दराने तब्बल साडेआठ कोटी रुपये इतकी रक्कम आहे. हे सर्व उद्धव ठाकरेंनी रेकॉर्डमध्ये दाखवलेले नाही याचाच अर्थ ती संपत्ती बेनामी संपत्ती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT