उद्धव ठाकरे यांच्याकडून आता राज्यभरात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे.
मुंबई : शिवसेनेत बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. नगरसेवकांपासून ते खासदारांपर्यंत अनेकजण एकनाथ शिंदेंना जाहीर पाठिंबा देत आहेत. शिवसेनेत झालेली ही बंडाळी आतापर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी ठरलीय. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून आता राज्यभरात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे.
उद्धव ठाकरेंनी नुकत्याच तीन महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये उद्धव ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहणारे अरविंद सावंत आणि भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना प्रमोशन मिळालं आहे. तर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके (Liladhar Dake) यांच्या मुलावर ठाकरेंनी महत्त्वाची जबाबदारी सोपवलीय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानं खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant), आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी आणि पराग लीलाधर डाके (Parag Liladhar Dake) यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आलीय. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस निघालेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आलीय. त्यामुळं एकनाथ शिंदेंच्या बंडामुळं पडझड झालेला शिवसेनेचा किल्ला आता उद्धव ठाकरेंनी पुन्हा बांधायला सुरुवात केलीय. ह्या नियुक्तींमुळं उद्धव ठाकरेंकडून निष्ठावंतांची विशेष काळजी घेतली जात असल्याचं पहायला मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.