Uddhav Thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : 'तुमचे बाप किती तुम्हालाच माहिती!' उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर जहरी टीका

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण हे वेगळ्या दिशेनं जात असल्याचे दिसून आले आहे. त्या एका जाहिरातीनं सगळ्यांचीच झोप उडाली.

युगंधर ताजणे

Uddhav Thackeray : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी शिबिरामध्ये जहरी टीका करुन खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना ही उत्तमपद्धतीनं सरकार चालवू शकते आणि आम्ही ते करुन दाखवले आहे. असे म्हणत येत्या काळामध्ये आम्ही आणखी खंबीरपणे वाटचाल करणार असल्याचा निर्धार ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण हे वेगळ्या दिशेनं जात असल्याचे दिसून आले आहे. त्या एका जाहिरातीनं सगळ्यांचीची झोप उडाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेली ती जाहिरात होती. देशात नरेंद्र आणि राज्यात एकनाथ शिंदे अशा आशयाच्या त्या जाहिरातीनं अनेकांना धक्का बसला होता. त्या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नव्हता. त्यामुळे फडणवीसांना डावलण्याचा तर हा प्रयत्न नाही ना अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

यासगळ्यात वरळीमध्ये पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे. त्या जाहिरातीमध्ये आनंद दीघे यांचा देखील फोटो नव्हता. ही गोष्ट अनेकांनी निदर्शनास आणून दिली होती.

विरोधी पक्षावर टीका करताना ठाकरे म्हणाले की, हे काही विचारांचे वारसदार नाही. ते गद्दारांच्या विचारांचे वारसदार आहेत. भाजपला जे सुखात सोबत आहेत तेवढेच हवे आहेत. उद्या मात्र तुमच्या बरोबर कोण राहणार नाही हे लक्षात ठेवा.

देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रश्न विचारला आहे तो असा की, कर्नाटक सरकारनं सावरकरांविषयीची धडा अभ्यासक्रमातून वगळला आहे. यावर उद्धव ठाकरे यांचे मत काय आहे. तर मी त्यांना सांगेल की, फडणवीस तुमची परिस्थिती खूप हालाखीची आहे. सहनही होत नाही, आणि सांगताही येत नाही. अशी परिस्थिती फडणवीसांची आहे.

कारण त्यांना वरुन आदेश आहे. देवेंद्रजी सावरकरांचा धडा वगळला याचा निषेध शिवसेना करते. पण ज्या सावरकरांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरणयातना भोगल्या त्या सावकरांच्या विचारधारेशी ज्यांचा काडीमात्र संबंध नाही त्यांना तुम्ही सहभागी करुन घेता याबद्दल तुमचे मत काय? असा प्रश्न ठाकरेंनी यावेळी विचारला.

जर तुम्ही खरे सावरकरप्रेमी असाल तुमच्या वरती जे बसले आहेत जसे राऊत म्हणाले आमचा एकच बाप आहे, तर तुमचे किती हे तुम्हालाच माहिती....कारण मध्ये जाहिरात आली होती. त्यात बाप बदलला होता. नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा वेगळाच फोटो....तर तुम्ही खरे सावरकर प्रेमी असाल तर देशावर हक्क सांगणाऱ्या तुमच्या नेत्याचा धिक्कार करा. असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसते आहे. तुम्हाला तुमचा काय जोर दाखवायचा आहे की, तो मणिपूरमध्ये दाखवा. तुमची ताकद त्या राज्यामध्ये दाखवा. देशातला एक भाग पेटला आहे आणि तुम्ही अमेरिकेमध्ये जाता. याला काय अर्थ आहे का असा प्रश्न मोदींना उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या जाहिरातीनं वेगळ्याच चर्चेला तोंड फोडले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस शेजारी बसले होते. मात्र त्यांनी एकमेकांशी बोलणे टाळले होते. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात काहीतरी नाराजी आहे. असा सूर आळवला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT