Uddhav Thackeray Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

दोन दिवसांत ठाकरे शिंदे भेटणार? दीपाली सय्यदांच्या ट्वीटची चर्चा

मध्यस्थी केल्याबद्दल त्यांनी विनोद तावडे आणि पंकजा मुंडे या भाजपा नेत्यांचे आभारही मानले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या राजकारणातल्या नाट्यमय घडामोडी आणि शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडानंतर ठाकरे आणि शिंदे यांच्यात तणाव निर्माण झाल्याचं चित्र आहे. अशातच आता हे दोघेही एकमेकांना भेटणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याचं कारण म्हणजे दीपाली सय्यद यांनी केलेलं एक ट्वीट आणि त्यांनी दोघांच्याही भेटी घेणं. (Maharashtra Politics)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एकमेकांना भेटणार असल्याचे संकेत देणारं ट्वीट शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayyad) यांनी केलं आहे. या भेटीसाठी मध्यस्थी केल्याबद्दल त्यांनी भाजपचे आभारही मानले आहेत. सय्यद आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, "येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरं वाटलं. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहेत. या मध्यस्तीकरता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद, चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल."

दीपाली सय्यद यांनी दोन्ही गटात मध्यस्तीसाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांचीही भेट घेतली होती. तसंच दोघांची भेट घडावी अशी इच्छा याआधीही बोलून दाखवली होती. "उद्धवसाहेबांनी आमदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे नेहमीच उघडे ठेवले असून एकनाथ शिंदे यांच्यावतीने प्रवक्ते आणि आमदारांनी उद्धव साहेबांशी चर्चा करण्याची विनंती केली आहे. ही सर्व घटना शिवसेनेचा (Shivsena) भाजपावर असलेल्या हिंदुत्वाच्या विश्वासामुळे घडली असून भाजपाने मोठ्या मनाने मध्यस्ती करावी", असंही त्यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur South-West Constituency: फडणवीसांविरोधात कोण? नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून 41 अर्जांची उचल

३९ व्या वर्षी आई झाली टीव्हीची 'मधुबाला'; १० व्या महिन्यात दिला गोंडस बाळाला जन्म, चाहते करतायत तब्येतीची विचारणा

Maharashtra Weather Update : राज्यात पाऊस घेणार विश्रांती; 'या' तारखेनंतर राज्यात थंडीची चादर

Winter Heart Care: हिवाळ्यात वाढू शकतो हृदयविकाराचा धोका, वेळीच ओळखा 'ही' 5 लक्षणे

Latest Maharashtra News Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात होणार द्विपक्षीय चर्चा

SCROLL FOR NEXT