uddhav thackeray Faction samana editorial on NCP ajit pawar oth eknath shinde devendra fadnavis govt over samriddhi highway accident  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : इकडे मृतांच्या चिता जळत होत्या अन् मुंबईच्या राजभवनात…; ठाकरे गटाचा हल्लाबोल

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस याच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान राजभवनात पार पडलेल्या य़ा सोहळ्यावर उद्धव ठाकरे गटाकडून कडाडून टीका करण्यात आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेला काही दिवसचं उलटलेले असतानाच राज्यात शपथविधी पार पडला. यावरून उद्धव ठाकरे गटाचं मुखपत्र 'सामना' जोरदार टीका करण्यात आली आहे.

"देशभरात असे अनेक महामार्ग गेल्या काही वर्षांत निर्माण झाले. दिल्लीपासून उत्तरेतला ‘यमुना एक्सप्रेस वे’ असेल नाही तर इतर महामार्ग, मग अपघातांचे प्रमाण आपल्याच समृद्धी महामार्गावर जास्त का?" असा थेट सवाल अग्रलेखात विचारण्यात आला आहे.

CM शिंदेंवर गंभीर आरोप..

‘एमएसआरडीसी’ कंपनीने हा मार्ग बांधला व हे खाते गेली अनेक वर्षे एकनाथ शिंदे सांभाळत आहेत. त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले, पण हे खाते त्यांनी स्वतःपाशीच ठेवले. कारण त्यात राज्याचे सगळ्यात मोठे अर्थकारण आहे. त्याच अर्थकारणातून समृद्धीवर बळी जात आहेत काय? महाराष्ट्रात एक संवेदनाहीन सरकार सत्तेवर आहे.

"समृद्धी महामार्गावरील पेटलेली बस आणि त्यातील होरपळलेल्या प्रवाशांच्या किंकाळ्या यांना काय अस्वस्थ करणार? तिकडे निरपराध्यांची प्रेते जळत होती व इकडे भाजप, मिंधे गट व अजित पवारांचा गट शपथविधी सोहळ्यात दंग होता. मुर्दाडांचे राज्य यालाच म्हणतात", असे ताशेरे अग्रलेखाल ओढण्यात आलेत.

"महाराष्ट्रातला राजकीय गदारोळ संपलेला नाही, पण त्या गदारोळात समृद्धी महामार्गावर होरपळलेल्या जिवांचा आकांत आणि त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश विरून जाऊ नये. महाराष्ट्राच्या राजकारणास एक संस्कृती आणि परंपरा आहे. ते राजकारण इतके निर्दयी का झाले? समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या चिता जळत असताना मुंबईच्या राजभवनात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला. पेटलेल्या चिता व आक्रोशाची पर्वा न करता राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सुरू होता. एकमेकांना पेढे भरवले जात होते. फटाके फोडून गळाभेटी घेतल्या जात होत्या. महाराष्ट्रातील मृत्यूचे तांडव व पेटलेल्या चितांची दखल न घेता हे प्रकार महाराष्ट्रात सुरू आहेत. कालच्या राजकीय उलथापालथीत व उखाळ्या पाखाळ्यात समृद्धीवरील ‘हत्या’ विसरल्या जाऊ नयेत."

"बुलढाण्याजवळ याच महामार्गावर शनिवारी भीषण बस अपघात होऊन 25 जणांचा जळून कोळसा झाला. समृद्धी महामार्ग सुरू होऊन 203 दिवस झाले. या काळात 450 अपघात झाले व त्यात साधारण शंभरच्या आसपास लोकांना जीव गमवावे लागले आहेत. शनिवारीच समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात झाला. त्यात एका चिमुरडीसह आई-वडिलांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशीही एक कार दुभाजकावर धडकून झालेल्या दुर्घटनेने आई-वडील आणि मुलगा यांचा बळी घेतला.

या एकाच मार्गावर इतके अपघात का होत आहेत? इतके बळी का जात आहेत? सरकारने आता बस ड्रायव्हरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला, पण त्याच महामार्गावर छोट्या वाहनांचा अपघात होऊन आतापर्यंत कुटुंबेच्या कुटुंबे जागीच ठार झाली. या सर्व अपघातांबाबत शिंदे-फडणवीस सरकार स्वतःवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून घेणार आहे काय?" असा सवाल सामनाच्या अग्रलेखात विचारण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT