Devendra Fadnavis and Ajit Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Nawab Malik: 'मलिकांना सोबत नको' अजितदादांना पत्र लिहिणाऱ्या फडणवीसांना ठाकरे गटाचा टोला; म्हणाले, तेव्हा नैतिकता...

तेव्हा तुमची नैतिकता कुठे होती. असा सवाल करताना भाजपच्या कुठल्या नेत्याला आता पत्र लिहिणार? असा सवालही केला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाच्या कामकाजात सहभाग घेतला. अजितदादा गटाच्या बाजूनं त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. पण यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत अजितदादांना थेट पत्र लिहिलं आहे. तसेच मलिकांना महायुतीत घेता येणार नाही, असं म्हटलं. यावरुन आता शिवसेनेच्या ठाकरे गटानं त्यांना टार्गेट केलं आहे. (Uddhav Thackeray group attack on Devendra Fadnavis regarding letter to Ajit Pawar on Nawab Malik)

ठाकरे गटानं फडणवीसांच्या या पत्रावरुन सडकून टीका केली तसेच अजित पवारांना सोबत घेतलं तेव्हा तुमची नैतिकता कुठे होती? असा सवाल केला आहे. ठाकरे गटाच्यावतीनं सुषमा स्वराज यांनी म्हटलं की, "नवाब मलिक यांच्या अजितदादांसोबत येण्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी अजिदादांना एक पत्र लिहिलं आहे. (Latest Marathi News)

यामध्ये अशा पद्धतीनं त्यांना महायुतीत सामावून घेऊ नये असं म्हटलं आहे. सगळाच गमतीदार भाग आहे. ज्यापद्धतीनं फडणवीस ट्रोल झाले आहेत, त्यानंतर त्यांना ही उपरती झालेली आहे"

तेव्हा हाच विवेकवाद कुठे होता?

"आपल्या पत्रात फडणवीसांनी सत्तेपेक्षा देश मोठा असं म्हटलं आहे. पण फडणवीसांना आम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे की, सत्तेपेक्षा देश मोठा म्हणता तेव्हा आत्तापर्यंत ज्या लोकांवर भाजपनं आरोप केले त्यांना सत्तेत घेताना त्यांचा विवेकवाद कुठे गेला होता? सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या अजितदादांना आपण पत्र लिहित आहात त्यांना मोदींनी महाराष्ट्रात येऊन ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आणि बँक घोटाळ्याचा आरोप केला होता. (Latest Marathi News)

इतका मोठा आरोप केल्यानंतरही त्यांना सत्तेत सामावून घेणं हे तुमच्या नैतिकतेत बसत होतं का? त्यावेळी सत्तेपेक्षा देश मोठा हे तत्वज्ञान का सुचलं नाही. अजितदादांना सत्तेत सामावून घेणं चुकीचं आहे, असं सांगणारं पत्र भाजपच्या कुठल्या नेत्यांना लिहाल एवढाच आमचा प्रश्न आहे," अशा शब्दांत अंधारेंनी फडणवीसांना अनेक सवाल विचारले आहेत.

फडणवीसांनी पत्रात काय लिहिलं?

फडणवीस अजित पावारांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, "ज्या पद्धतीचे आरोप नवाब मलिकांवर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही, असं आमचं मत आहे, सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र, अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे.

आपल्या पक्षात कोणाला घ्यायचं, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळं महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो. त्यामुळं आमचा या गोष्टीला विरोध आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणा-या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT