uddhav thackeray and narendra modi uddhav thackeray and narendra modi
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांना टोला; म्हणाले, देशाचे पंतप्रधान आहेत की गावचे सरपंच

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना स्थापन झाल्यापासून शिवसेनेने कधीही झेंटा, रंग, विचार, नेता बदलला नाही. तुम्ही मात्र लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी यांना विसरले. कुठेही त्यांचा फोटो दिसत नाही. फक्त नरेंद्र मोदी (narendra modi) यांचा फोटो दिसतो. लोकसभेची निवडणूक असो किंवा सरपंचपदाची प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदींचाच चेहरा दिसतो. मोदी हे पंतप्रधान आहे की गावचे सरपंच, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केंद्र सरकारवर हाणला.

भाजप नेहमी भगव्याचे रक्षण करण्यासाठी मैदानात उतरल्याचे सांगत असते. मात्र, कोणता भगवा. खरा भगवा शिवसेनेचा (Shivsena) आहे. अजून कोणताच नाही. तुमचा भगवा खरा भगवा नाही. यांच्याकडून देशात दुसरा हिंदुसम्राट निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. हिंदुसम्राट म्हटलं की फक्त बाळासाहेब ठाकरे आठवतात. तेव्हा भाजपचा नकली बुरखा व भगवा फाडायला हवा, असेही उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले.

आज हे बाळासाहेब ठाकरे यांनाही विसरले आहे. म्हणूनच त्यांनी समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले नाही. भाजपने ऐवठाही मोठेपणा दाखवला नाही. आम्ही सोबत असतानाही अशी मागणी केली नाही. आता महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आम्ही समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे नाव दिल्याचे उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सांगितले.

अमित शहांनी मला मुख्यमंत्रिपदाचे वचन दिले होते. मात्र, निवडणूक जिंकल्यानंतर तुम्ही भाजपने (BJP) ते वचन पाळले नाही. उलट असे कोणतेही वचन दिले नसल्याचे सांगितले. आधी तुम्ही याचे उत्तर द्या. आमच्यावर आरोप करण्याअगोदर आपल्याकडे बघा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजप म्हणजे हिंदुत्व होत नाही

भाजपने हिंदुत्वाचा ठेका घेतलेला नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व होत नाही. भाजपला सोडले म्हणजे हिंदुत्वाला सोडले असे नाही. शिवसेना समोरून वार करते, पाठीमागून वार करीत नाही. पहाटे सरकार स्थापन केले नाही. युती आम्ही तोडली नाही तर भाजपान तोडली असेही उद्धव ठाकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT