Uddhav Thackeray on 17th December MVA rally and Karnataka border issue bhagatsingh koshyari controversy  Sakal media
महाराष्ट्र बातम्या

Border Dispute : गुजरात निवडणुकीसाठी उद्योग पळवले, आता कर्नाटकसाठी…; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांकडून करण्यात आलेल्या वादग्रस्त विधाने केली गेली. यानंतर आता राज्य सरकारविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या मुद्दयांवर १७ डिसेंबरला मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली. यासंबंधी मविआच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, १७ तारखेला महाराष्ट्रद्रोहींविरूध्द हल्लाबोल असा हा महाप्रचंड, अतिविराट मोर्चाची सुरूवात जीजामाता उद्यानापासून होईल आणि छत्रपती शिवाजी टर्मिनल्स येथपर्यंत मार्चा जाईल. हा मोर्चा भूतो न भविष्य होईल कारण सध्या महाराष्ट्राचं अस्तित्व नाकारण्यात येत आहे. महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होतोय. राज्याच्या कडेवरील गावांवर आजूबाजूची राज्य हक्क सांगत आहेत. अगदी मुंबईवर सुद्धा कसा घाला घातला जात आहे यावर आम्ही बोलणार आहोत असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा - Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

मानकऱ्यांचे अभिनंदन..

गेल्या वेळेला दिल्ली महापालिका, हिमाचल आणि गुजरात या तिन्ही निवडणुकांमध्ये भाजप जिंकला होता, पण यावेळी मात्र दिल्लीत आप हिमाचलमध्ये कॉंग्रेस जिंकलेली आहे. गुजरातमध्ये भाजपने अभूतपुर्व यश मिळवलं त्याबद्दल मानकऱ्यांचे अभिनंदन असे उद्धव ठाकरे म्हणाले.

विजयात पळवलेल्या उद्योगांचे योगदान..

गुजरातच्या विजयामध्ये महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगांचे योगदान आहे हे कुणी विसरू नये. एकाबाजूला महाराष्ट्र ओरबाडून हवं ते साध्य करायचं. म्हणूनच आम्हाला भीती वाटतेय की, गुजरातमधील निवडणुकांसाठी जसे महाराष्ट्रतील उद्योग पळवले तसं कर्नाटकची निवडणुक डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रातील गावे तोडतील की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, वेळेत या महाराष्ट्रद्रोह्यांना आवरलं नाही, तर महाराष्ट्र छिन्नविच्छिन्न करायला मागेपुढे पाहाणार नाहीत. यांच्या मनातील विष उघडपणाने समोर येत आहे. त्यामुळे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत, ते कोणत्याही विचाराचे, पक्षाचे असोत त्यांना एकत्र येण्याचं आव्हान करतो आहोत असे उद्धव ठाकरे यावेळ म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादीचे नेत अजित पवार, उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT