Uddhav Thackeray on Budget esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray on Budget : ''निर्मला सीतारामण यांनी चार जातींचा उल्लेख केला, त्यांचं मी अभिनंदन करतो'' उद्धव ठाकरे स्पष्ट बोलले

Mention of four classes namely farmers, women, youth and poor: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधला शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, गरीब या चार वर्गांचा उल्लेख करुन त्यावर सरकार काम करत असल्याचं सांगितलं.

संतोष कानडे

रायगडः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधला शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, गरीब या चार वर्गांचा उल्लेख करुन त्यावर सरकार काम करत असल्याचं सांगितलं.

याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टिकाटिपण्णी केली. ते रायगडच्या पेणमध्ये बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामण यांनी सादर केला आहे. मी अर्थमंत्र्यांचे आभार मानतो की शेवटचा का होईना पण त्यांनी जड अंतःकरणाने अर्थसंकल्प सादर केला.

ठाकरे पुढे म्हणाले, मी मोबाईलवर ऑनलाईन हायलाईट्स बघितल्या आहेत. त्यात सीतारामण म्हणाल्या यांनी देशात चार जातींसाठी काम करणार असल्याचं म्हटलं. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी. मी अर्थमंत्र्यांचं अभिनंदन करतो त्यांनी मोठं धाडस केलेलं आहे. पंतप्रधानांसमोर बोलण्याचं हे धाडस केलंय.

ठाकरे म्हणाले, अरे धाडस काय? कारण निवडणुका आल्यानंतर का होईना हा देश म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या सुटाबुटातल्या मित्रांचा नसून तरुण, शेतकरी, गरीब आणि महिलांचा आहे.. दहा वर्षांनंतर तुम्हाला हे लक्षात आलं आहे.

''महिलांकडे लक्ष देत आहात तर मणिपूरमध्ये का जात नाहीत. बिल्किस बानोकडे जा, त्यांच्या अत्याचाऱ्यांना तुम्ही सोडलं होतं. तिला न्याय द्या. आज तुम्हाला देशातल्या महिला दिसत आहेत, कारण निवडणुका आल्या आहेत.''

उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकारचं हे सगळं थोतांड आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे सामान्यांना टोपी घालण्याचा प्रकार आहे. आता फुकटात गॅस देतील आणि निवडणुकीनंतर दुपटी-तिपटीने गॅसचे भाव वाढवतील.

अर्थसंकल्पातून महिलांना काय मिळालं?

  • महिलांची उद्योजकता २४ टक्क्यांनी वाढवली गेली असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

  • पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ७० टक्के महिलांना घरे दिल्याने त्यांचा सन्मान वाढला आहे

  • एक कोटी महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ मिळाला आहे हा आकडा तीन कोटी रुपयांपर्यंत नेला जाणार आहे

  • सर्व्हायकल कँसरबाबत ९ ते १४ वर्ष वयोगटातील महिलांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे

  • गेल्या दशकात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) अभ्यासक्रमांमध्ये महिलांची नोंदणी २८ टक्क्यांनी वाढली आहे

  • महिलांसाठी विधानसभेमध्ये एक ततृतीयांश जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

Latest Maharashtra News Updates live : फूट पाडणारे राजकारण कोण खेळत आहे हे प्रत्येकजण पाहू शकतो : आमदार सुवेंदू अधिकारी

SCROLL FOR NEXT