Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: राष्ट्रवादीबरोबर प्रश्न सुटला, काँग्रेस अन् वंचितचं काय?; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं

जागावाटपाच्या चर्चेवर उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. तसेच निवडणुका ३० एप्रिच्या आत होतील, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि वंचितच्या प्रश्नावर लवकरच बैठक घेणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

Sandip Kapde

Uddhav Thackeray: राज्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. ठाकरे गट या निवडणुकीत तारदीने उतरणार आहे. दरम्यान जागावाटपाच्या चर्चेवर उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. तसेच निवडणुका ३० एप्रिच्या आत होतील, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि वंचितच्या प्रश्नावर लवकरच बैठक घेणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीत जागावाटप सुरळीत होईल. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमची बोलणी जवळपास झाली आहे. इंडिया आघाडीची बैठक झाली तेव्हा राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत बोललो आहे. बाहेर ज्या बातम्या येत आहेत. त्यावर कोणी लक्ष देऊ नका. आघाडीत बिघाडी मी होऊ देणार नाही. काँग्रेसचे प्रमुख नेते माझ्यासोबत बोलत नाही, तोपर्यंत मी काहीही सांगणार नाही.

वंचित आघाडीबाबत काय ठरलं-

वंचित आघाडी बरोबर बोलणी सुरु आहे. काँग्रेस, शिवसेना आणि वंचित, राष्ट्रवादी अशी बैठक घेण्याचे आमचे नियोजन आहे. 12+12+12+12, असा कुठलाही फॉर्म्युला माझ्यापर्यंत आला नाही. प्रत्येक्ष भेटून निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादी बरोबर आमचा प्रश्न सुटला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर मोठी घटना! सुमारे 40-50 फूट खोलवर लागली आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT