Uddhav Thackeray : अलिबागमधील कोरलाई गावात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर अधिकृतपणे 19 बंगले बांधल्याचा आरोप आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. काही महिन्यांपूर्वी याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला होता. सध्या या प्रकरणात एक मोठा अपडेट समोर आला आहे.
अलिबागमधील कथित 19 बंगल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजी माजी ग्रामसेवक आणि सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमबाह्य बांधकाम परवानगी दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
यापूर्वी रेवदंडा पोलिसांनी कोरलाई गावचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली होती. अलिबागमधील कथित 19 बंगल्यांच्या प्रकरणात पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणावर भाष्य केले आहे. फडणवीस म्हणाले, याबाबत तक्रार दाखल झालेली आहे. आता लवकरच चार्जशीट तयार होईल.
रश्मी ठाकरेंची चौकशी का नाही?
मालमत्ता रश्मी ठाकरे यांच्या नावावर आहे. चौकशी सुरू आहे. तर रश्मी ठाकरे यांची चौकशी का होत नाही, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर फडणवीस म्हणाले, आवश्यकता नाही. तसेच चौकशी कुणाची करावी आणि कुणाची नाही हे सरकार ठरवत नाही. हे पोलीस ठरवतात.
सरकार त्यात हस्तक्षेप करत नाही जसे उद्धव ठाकरे करत होते. आम्ही हस्तक्षेप केला तर सिस्टीम नीट चालणार नाही. पोलिसांना ज्याची चौकशी करायची आहे पोलीस करतली. मी एवढेच सांगतो जो चुकीचा असेल त्याच्यावर कारवाई होणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
काय होतं प्रकरण?
किरीट सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार, 2013-14 मध्ये उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक यांच्याकडून साडेनऊ एकर जमीन आणि 19 बंगले खरेदी केले होते. ज्याला त्यांनी नंतर रश्मी ठाकरे यांचे नाव केले. या जागा व बंगल्याचा मालमत्ता करही सन 2013 पासून भरला जात आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवताना प्रतिज्ञापत्रात जमिनीचा उल्लेख केला असला तरी 19 बंगले दाखवले नाहीत. किरीट सोमय्या यांनी याबाबत आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
सोमय्या म्हणाले की, ही फसवणूक आहे, जेव्हा ही घरे 2008 पासून बांधली गेली, ज्यात खरेदीची सर्व कागदपत्रे, मालमत्ता कराच्या पावत्या आहेत. लवकरच रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीही नावे तपासात पुढे येतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.