Chief Minister Eknath Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: "मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे"; CM शिंदेंचा हल्लाबोल

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घणाघात केल आहे. मराठा आरक्षणावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. ठाकरेंनी सकाळी पत्रकार परिषदेत आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. (Uddhav Thackeray real killer of Maratha reservation says CM Eknath Shinde)

मंत्र्यांनी राजीनामा द्यावा - ठाकरे

महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी नैतिक जबाबदारी घेत आपल्या पदांचा राजीनामा द्यायला पाहिजे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चिंतामणराव देशमुख यांनी मराठी बाणा दाखवला होता, अशा शब्दांत असं उद्धव ठाकरेंनी सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला होता. ठाकरेंच्या या सूचनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मराठी बाण्यावर आणि मराठा आरक्षणावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. कारण मराठा समाजाबद्दल त्यांना किती संवेदना आहे हे मराठा समाजाला आणि आम्हालाही माहिती आहे. ज्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण दिलं. हायकोर्टात ते चॅलेंज झालं, पण ते टिकवण्याचं काम देवेंद्रजी आणि आम्ही केलं. (Latest Marathi News)

पण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर मुख्यमंत्री कोण होतं? उपसमितीचं अध्यक्ष कोण होतं? असा सवाल करत यांनी हे आरक्षण टिकवलं नाही. त्यामुळं मराठा समाजाचे खरे मारेकरी तुम्ही आहात. त्यामुळं तुम्हाला यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. (Marathi Tajya Batmya)

इम्पिरिकल डेटाचं काम युद्धपातळीवर

मराठा समाजाच्या महिलांच्या मुक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवणारे महिलांचा अपमान करणारे कोण होते? हे सकळ मराठा समाजाला माहिती आहे. म्हणून जे मराठा समाजाचं आरक्षण घालवायला जबाबदार तुम्ही आहात, ते आम्ही आता मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आम्ही क्युरेटिव्ह पेटिशन दाखल केली आहे.

आयोगाला इम्परिकल डेटा गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु केलं आहे. मराठा समाजाला आम्ही आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: मंत्रीमंडळ बैठकीतून बाहेर पडण्यामागं नाराजीचं कारण होतं का? अजित पवारांनी अखेर स्पष्टच सांगितलं

Latest Marathi News Updates: छगन भुजबळ पोलिस आयुक्तांच्या भेटीला

IND vs AUS : आपला Rohit Sharma नाही, तर त्यांचा...! ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू Border-Gavaskar Trophy ला मुकणार

Donate Hair For Cancer Patients: कॅन्सरग्रस्त महिलांनाही सुंदर दिसण्याचा सुकेशिणी होण्याचा अधिकार, साम वृत्तनिवेदिकेने केले केशदान

बापावरून बोललेलं मी नाही ऐकणार... अपूर्वाने सांगितलं 'रात्रीस खेळ चाले' मालिका सोडण्याचं कारण, म्हणाली- तुमचे निर्माते जेव्हा

SCROLL FOR NEXT