Video viral 
महाराष्ट्र बातम्या

Video:'पुन्हा पेटवा मशाली'! किशोरी पेडणेकरांचं गाणं ऐकलं? आनंद गगनात मावेना

राज्याच्या घडामोडींकडे पाहता त्या गाण्यामध्ये बदल करण्यात आला आहे. हे गाणं सादर करताना पेडणेकर यांचा उत्साह दिसून येतो आहे.

सकाळ डिजिटल टीम

Uddhav Thackeray Shivsena: मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया आता चर्चेत आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेल्या नव्या चिन्हावरुन आता सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया लक्ष वेधून घेत आहेत. यासगळ्यात पेडणेकर यांची प्रतिक्रिया भलतीच व्हायरल झाली आहे.

उषकाल होता होता हे गाणं सादर करताना त्यांनी म्हटलं आहे की, त्यांनी खरं ते गाणं वेगळं आहे. मात्र आपण शिवसैनिकांसाठी ते गाणं थोड्या वेगळ्या पद्धतीनं तयार केलं आहे. राज्याच्या घडामोडींकडे पाहता त्या गाण्यामध्ये बदल करण्यात आला आहे. हे गाणं सादर करताना पेडणेकर यांचा उत्साह दिसून येतो आहे. त्यांनी आता नव्यानं एका लढाईला आपल्या सर्वांना सामोरं जायचं असून त्यासाठी तयार राहण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

काळरात्र होता होता उष:काल झाला, अरे पुन्हा शिवसैनिकांनो पेटवा मशाली, पेटवा मशाली. आपल्याला शिवसेना उद्ववजी बाळासाहेब ठाकरे असे नाव मिळाले. आपण पहिली लढाई जिंकली. आता प्रत्येक घराघरात हे चिन्ह आपल्याला पोहचावयचे आहे. ज्यानं आपल्या पक्षात काळरात्र केली त्याला दाखवून द्या की शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. किशोरी पेडणेकर यांच्या प्रतिक्रियेवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पुन्हा प्रतिक्रिया दिल्या आहे.

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं आणि शिवसेना हे नाव वापरण्यास मनाई केल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला कोणतं चिन्ह आणि नाव मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर निवडणूक आयोगाने आज याबद्दलचा निर्णय दिला आहे

Uddhav Thackeray Shivsena

उद्धव ठाकरे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 'मशाल' हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' असे नाव देण्यात आले आहे. यासोबतच एकनाथ शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असे नाव देण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: सीएची नोकरी सोडली; आईसोबत सुरु केला व्यवसाय, वर्षाला कमावतोय 50 लाख रुपये

IND vs NZ, Pune Test: गौतम गंभीर काल म्हणालेला KL Rahul च्या पाठिशी अन् आज बिचाऱ्याला पाणी आणायला ठेवलं

तुझ्या दोन आई आहेत ना? मित्राच्या प्रश्नानंतर अशी झालेली इशा देओलची अवस्था; घरी येताच हेमा यांना म्हणाली-

Latest Maharashtra News Updates live : आपचे नेते अरविंद केजरीवाल महाराष्ट्रात प्रचार करणार

Diwali 2024 : भारतातील काही भागात दिवाळीदिवशी 'राक्षसी दिवे' का पेटवले जातात? काय आहे त्यामागची गोष्ट

SCROLL FOR NEXT