Uddhav Thackeray criticizing Amit Shah's political strategies esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: घटनेच्या दहाव्या परिशिष्टाच्या हत्येची सुपारी, देशाचे सरन्यायाधीश काय भूमिका घेणार?; ठाकरेंची घणाघाती टीका

Uddhav Thackeray Criticizes Shah's Strategy: अमित शहा यांच्या या राजकीय डोहाळ्यांचा मराठी जनतेने नाशिकमध्ये कडाडून विरोध केला आहे. शहा आणि त्यांच्या मिंधे गटाच्या या डोहाळ्यांचा प्रतिकार करण्यासाठी महाराष्ट्रातील जनता एकत्र येत आहे, आणि त्यांच्या विकृत राजकारणाचा ठेचा दिला जाईल, असा पलटवार ठाकरे गटाने केला.

Sandip Kapde

ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि शिवसेना शिंदे गटावर घणाघाती टीका केली आहे. त्यांनी अमित शहा यांना उद्देशून म्हटले आहे की, शहा महाराष्ट्रात सत्ता राखण्यासाठी "फोडा-झोडा" धोरणाचा अवलंब करीत आहेत. त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या खतम करण्याची इच्छा व्यक्त केली असून, त्यासाठी विकत घेतलेल्या आमदारांवर अवलंबून राहण्याचे दिवस त्यांच्यावर आले आहेत.

ठाकरे यांचे गंभीर आरोप

ठाकरे गटाने आरोप केला की, देशाचे गृहमंत्री अमित शहा "फोडा-झोडा" प्रवृत्तीस म्हणजेच पक्षांतरास खुले समर्थन देत आहेत. त्यांनी घटनेच्या दहाव्या परिशिष्टाच्या हत्येची सुपारी घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. ठाकरे यांच्या मते, शहा यांचा हा दृष्टिकोन लोकशाहीला मारक ठरू शकतो, आणि त्यांचा हा धोरण महाराष्ट्राच्या हितासाठी घातक आहे.

सरन्यायाधीश यावर काय भूमिका घेणार?

तसेच देशाचे सरन्यायाधीश पदाचा आब राखत नाहीत. अमित शहा हे गृहमंत्रीपदाला शोभणारे वर्तन करीत नाहीत. त्यांनी पदाचा गैरवापर निवडणुका जिंकण्यासाठी व विरोधकांचे पक्ष फोडण्यासाठी केला. याची कबुली ते स्वतःच देतात. देशाचे सरन्यायाधीश यावर काय भूमिका घेणार? असा सवाल देखील ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रातील लोकांनी मोदी-शहा यांच्या भ्रष्ट राजकारणाला नाकारले आहे. शहांच्या "फोडा-झोडा" धोरणामुळे महाराष्ट्रात भाजपला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला आहे. शहा यांनी निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करण्याचे आदेश दिले आहेत, परंतु महाराष्ट्रातील लोकांनी याचा तीव्र निषेध केला आहे, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

पराभवाच्या भीतीने भाजपला धक्का

ठाकरे गटाने पुढे म्हटले की, भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पराभवाने धक्का बसला आहे. अमित शहा आणि त्यांच्या गटाने विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना विकत घेण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यांच्या या प्रयत्नांना मराठी जनतेने तितक्याच तीव्रतेने प्रत्युत्तर दिले आहे.

देशातील अन्यायाचे आणि भ्रष्टाचाराचे चित्रण

मणिपूर आणि कश्मीरसारख्या राज्यांतील अस्थिरतेचा उल्लेख देखील मुखपत्रात केला, तसेच महिलांवरील अत्याचारांच्या घटनांचे वाढते प्रमाणही अधोरेखित केले. ठाकरे म्हणाले की, अशा परिस्थितीत देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात फक्त निवडणूक आढावा बैठका घेण्यात व्यस्त आहेत, जे त्यांच्या पदाला साजेसे नाही.

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, अमित शहा यांच्या या राजकीय डोहाळ्यांचा मराठी जनतेने नाशिकमध्ये कडाडून विरोध केला आहे. शहा आणि त्यांच्या मिंधे गटाच्या या डोहाळ्यांचा प्रतिकार करण्यासाठी महाराष्ट्रातील जनता एकत्र येत आहे, आणि त्यांच्या विकृत राजकारणाचा ठेचा दिला जाईल.

राजकीयदृष्ट्या संपवण्याचा अफझलखानी प्रयत्न-

देशात कायद्याचा बाजार मांडला गेला तरी चालेल, पण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा अफझलखानी प्रयत्न या महाशयांनी केला आहे. महाराष्ट्रात मराठी माणसांचे हिंदवी स्वराज्य संपवण्याचा प्रयत्न चारशे वर्षांपूर्वी औरंगजेबाने केला होता, पण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राने औरंगजेबाला पंचवीस वर्षे आव्हान दिले आणि शेवटी त्याचे थडगे महाराष्ट्रातच उभारले. विशेष म्हणजे, औरंगजेबाचा जन्मही गुजरातेत झाला होता, आणि आज अमित शहा ज्या भाषेत धमक्या देत आहेत, त्याच भाषेत गुजरातेत जन्मलेल्या औरंगजेबानेही गर्जना केली होती. शेवटी, मराठी माणसांनीच त्या औरंगजेबाचे मस्तवाल राज्य संपवले, असे देखील ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT