Uday Samant Kavalapur Airport esakal
महाराष्ट्र बातम्या

'ठाकरे मुख्यमंत्री असतानाच कवलापूर विमानतळाची जागा गुजरातच्या कंपनीला विकली'; उदय सामंतांचा गंभीर आरोप

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी व त्यांना तिसऱ्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचा प्रचार सुरू झाला आहे.’

सकाळ डिजिटल टीम

सांगली : कवलापूर विमानतळासाठी (Kavalapur Airport) असलेली ६६ हेक्टर जागा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या काळात गुजरातच्या कंपनीला विकली होती, असा गंभीर आरोप उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही जागा परत मिळवली आणि विमानतळाचा प्रकल्प करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठाकरेंनी स्क्रीप्टेड भाषण न करता सत्यता जाणून घ्यावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. सांगली लोकसभा मतदारसंघातून खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सामंत यांनी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्‍यांची समन्वय बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी व त्यांना तिसऱ्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचा प्रचार सुरू झाला आहे.’ दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मिरजेच्या जाहीर सभेत कवलापूर विमानतळाबाबत भाजपवर निष्क्रियतेचा आरोप केला होता. त्यावर बोलताना सामंत म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या काळात कवलापूर विमानतळाची जागा गुजरातच्या व्यक्तीला दिली होती. ही जागा पुन्हा ताब्यात घेऊन विमानतळ करण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ व दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी पत्र दिले होते. त्यानुसार बैठक एमआयडीसी विभागाची बैठक लावली.

जागेची होणारी विक्री तत्काळ थांबवली. विमानतळासाठी आणखी आवश्यक असणारी जागा ताब्यात घेणे व विमानतळ करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा अहवाल तयार करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार सरकारने विमानतळासाठी पाऊल उचलले होते.’

ते म्हणाले, ‘जिल्ह्यात लॉजेस्ट्रिक पार्कसाठी केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, पण चुकीचा संदेश उद्धव ठाकरे पसरवत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेने एकत्र येऊन निवडणूक लढवली होती, पण ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. वडील चोरल्याचा आरोप आमच्यावर केला जातो, पण सांगलीत आल्यावर ठाकरे यांनी वसंतदादांच्या स्मारकाचे दर्शन घेतले, पण ते बाळासाहेबांच्या स्मारकावर गेले नाहीत. ‘उबाठा’ने शिवसेनेची काँग्रेस केली आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे येत आहेत. आठ ते दहा दिवसांत आणखी चित्र वेगळे दिसेल.’ यावेळी जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, महेंद्र चंडाळे, सुहास बाबर, आकाश माने, माधव गाडगीळ, अमोल पाटील, सनद पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

एमआयडीसीसाठी ९ कोटी

श्री. सामंत म्हणाले, ‘मिरज व कुपवाड एमआयडी विकासाठी ९ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यातून औद्योगिक वसाहतातील कामे होतील. तसेच तासगाव-कवठेमहांकाळमध्ये नवीन एमआयडीसीसाठी जमीन घेण्यात येणार आहे. शिवाय जिल्हा उद्योग परिषदेच्या १ हजार कोटींचे सामंजस्य करार झाले आहेत. त्यात माध्यमातून जिल्ह्यातील अडीच हजार जणांना रोजगार उपलब्ध होतील.’

चंद्रहार यांच्या उमेदवारीचे सत्य समोर आणू

श्री. सामंत म्हणाले, ‘माविआच्या जागा वाटपात ठाकरे गटाने सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. चंद्रहार यांना का उमेदवारी जाहीर केली, यामागचे सत्य हे आमचा उमेदवार निवडून आल्यानंतर जाहीर करू. त्यांची उमेदवारी योग्य की अयोग्य हे आता मतदार ठरवतील. त्यांच्या विरोधात आताच आक्रोश सुरू आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT