Uddhav Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले आमदार पिता-पुत्र उद्धव ठाकरेंच्या भेटीला? बजोरीया म्हणाले...

Viplav Bajoria: जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासबोतच्या 40 आमदारांची साथ सोडली होती. त्यामुळे शिवसेनेत मोठी फुट पडली होती.

आशुतोष मसगौंडे

जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या 40 आमदारांची साथ सोडली होती. त्यामुळे शिवसेनेत मोठी फुट पडली. यानंतर न्यायलयातील घडामोडींनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले होते.

यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असलेले आणखी काही आजी-माजी आमदार आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले होते.

यामध्ये माजी आमदार गोपीकिशन बजोरीया आणि त्यांच्या पुत्र आमदार विप्लव बजोरीया यांचाही समावेश होता.

दरम्यान साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार माजी आमदार गोपीकिशन बजोरीया आणि त्यांचे पुत्र आमदार विप्लव बजोरीया यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. असे असले तरी उद्धव ठाकरे यांनी या पिता-पुत्रांना पक्षात घेण्यास नकार दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाविकास आघाडीने चांगलाच धक्का दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या अनेक आमदारांना पुन्हा ठाकरेंसोबत येण्याचे वेध लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु, ठाकरे यांनी बजोरीया यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे आमदारांसाठी परतीचे दोर कापल्याचा संदेश दिला.

दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगले यश मिळाले. महविकास आघाडीच्या माध्यमातून लढत असताना त्यांनी 40 आमदार 13 खासदार सोडून गेलेले असताना पुन्हा 9 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे राज्यात अजूनही ठाकरेंना मानणारा वर्ग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकसभेच्या निकालांमुळे ठाकरेंना सोडून गेलेल्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू असल्याची चर्चा आहे. राज्यात येत्या तीन महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी पाहायला मिळू शकतात.

"आम्ही एकनाथ शिंदेंसोबतच"

दरम्यान या सर्व प्रकरणी माजी आमदार गोपीकिशन बजोरीया यांनी स्पष्टीकरण दिले असून, त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोब शेवटपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच राहणार असल्याचे बजोरीय यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पराभवानंतर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, राजीनाम्याची केली मागणी

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT