Uddhav Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : मुंबईला ‘अदानी सिटी’ करण्याचा मोदी, शहांचा डाव;उद्धव ठाकरे यांचा आरोप,धारावी प्रकल्पाची निविदा रद्द करण्याची मागणी

‘‘मोदी आणि शहा यांनी गुजरातला मुंबईची ‘गिफ्ट सिटी’ पळवून नेली आहे आणि मुंबईला अदानी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेच्या बाहेरील कामांचाही समावेश केला जात असून धारावीकरांना मुंबईतून हाकलून लावण्याचा डाव असून अदानींच्या घशात मुंबईच्या जमिनी घालण्याचा प्रयत्न आहे,’’

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘मोदी आणि शहा यांनी गुजरातला मुंबईची ‘गिफ्ट सिटी’ पळवून नेली आहे आणि मुंबईला अदानी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेच्या बाहेरील कामांचाही समावेश केला जात असून धारावीकरांना मुंबईतून हाकलून लावण्याचा डाव असून अदानींच्या घशात मुंबईच्या जमिनी घालण्याचा प्रयत्न आहे,’’ असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. लाडका मित्र, लाडका कॉन्ट्रॅक्टर आणि लाडका उद्योगपती योजना, अशा योजना राबविल्या जात असल्याचा टोला लगावत धारावीची निविदा ताबडतोब रद्द करण्याची मागणी ठाकरे यांनी केली.

मुंबईत शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. ते म्हणाले की धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा तातडीने रद्द करावी. धारावीकरांसाठी रस्त्यावर उतरून पुन्हा आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले, की धारावीकरांना त्यांच्या हक्काचे घर जिथल्या तिथे मिळालेच पाहिजे आणि तेही पाचशे चौरस फुटाचेच मिळाले पाहिजे. ही शिवसेनेची आग्रही भूमिका कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे महाबिघाडी सरकार फसव्या घोषणांचा पाऊस पाडायला लागले आहे. त्यांनी आतापर्यंत जो कारभार केला आहे, तो सर्व विसरून जनता फसव्या घोषणांना बळी पडून मतदान करेल, अशी एक वेडी आशा त्यांना असल्याचा चिमटा ठाकरेंनी सरकारला काढला.

ठाकरे म्हणाले, ‘‘अदानीला हा प्रकल्प दिला गेला त्यावेळी निविदेमध्ये नसलेल्या काही गोष्टी या आज ते देऊ करताहेत. त्या पैकी एक म्हणजे वारेमाप एफएसआय. धारावीचा प्रकल्प ५९० एकरच्या भूखंडावर आहे. त्यात ५९० एकरमध्ये तीनशे एकर हा गृहनिर्माणसाठी आहे. एकूण निविदेमध्ये कुठेही वाढीव टीडीआरचा उल्लेख नाहीये.

धारावीकरांना पात्र-अपात्रतेच्या चक्रव्यूहात अडकवून हाकलून लावण्याचा डाव आहे. पण पात्र-अपात्रतेचा निकष लावून त्यांना धारावी रिकामी करायची आहे. मग रिकामी धारावी अदानीच्या घशात अलगद गेल्यावर हे भूखंडाचं श्रीखंड ओरबडायला तयारच असल्याचा आरोप ठाकरेंनी केला.

धारावी केवळ झोपडपट्टी नाहीः ठाकरे

ही सगळी कारस्थाने मुंबईचे नागरी संतुलन बिघडवण्याचा डाव आहे. आपण मानसिक संतुलन बिघडलेली माणसे कोण आहेत आणि काय काय करताहेत ते आपल्याला माहिती आहेत. काहींच्या मानसिकतेला बुरशी आलेली असल्याचा संताप ठाकरे यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘धारावी ही केवळ फक्त झोपडपट्टी नाही तर त्यात एक वेगळेपण आहे. तिथल्या प्रत्येक घरामध्ये एक लघुउद्योग चालतो. कुंभार, ईडलीवाले, चामड्याचा उद्योग, वस्त्रोद्योग आहेत. त्या उद्योगधंद्यांचे करणार काय? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT