Uddhav Thackeray  sakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : भाजपपेक्षा काँग्रेससोबत ठाकरे अधिक सहज ; उपराष्ट्रपती, सोनिया गांधी व सुनीता केजरीवाल यांची घेतली भेट

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्याने काँग्रेसश्रेष्ठींसोबत असलेले शिवसेनेच्या ठाकरे यांच्या पक्षाचे संबंध अधिक घट्ट असल्याचे दिसून आले. उद्धव ठाकरे भाजपपेक्षा काँग्रेससोबत अधिक सहज असल्याचे या दौऱ्याने स्पष्ट झाले आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीत भेटी घेतल्याने शिवसेना व इंडिया आघाडीतील नेते यांचा एकमेकांमध्ये चांगला समन्वय असल्याचे दाखवून देण्यात आघाडी यशस्वी झाली आहे.

दिल्लीत येण्यास फारसे उत्सुक राहत नसलेले उद्धव ठाकरे यांनी तब्बल तीन दिवस मुक्काम केला. या काळात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील निवडणुकीच्या संदर्भात सखोल चर्चा केली.

निवडणुकीसाठी जागावाटप

  • तसेच प्रचाराचे मुद्दे व निवडणुकीची रणनीती काय राहील, यासंदर्भात

  • ही चर्चा प्रामुख्याने होती. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी यांचीही

  • सदिच्छा भेट घेतली. यावेळी रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते.

  • काँग्रेसश्रेष्ठींशी ठाकरे यांच्या सविस्तर भेटी झाल्याने काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संबंध अधिक घट्ट झाल्याचे बोलले जात आहे.

  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची सुद्धा ठाकरे यांनी सदिच्छा भेट घेतली.

  • यावेळी आपचे खासदार संजयसिंह, राघव चढ्ढा व खासदार संजय राऊत उपस्थित होते.

उपराष्ट्रपतींकडे दीड तास

उद्धव ठाकरे यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची त्यांच्या नव्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते. उपराष्ट्रपती धनकड यांना काही महिन्यांपूर्वीच नवे निवासस्थान मिळाले आहे. ही नवी वास्तूही ठाकरे यांना दाखविण्यात आली. तसेच धनकड व ठाकरे यांनी विविध विषयांवर चर्चा केली. ठाकरे कुटुंबिय जवळपास दीड तास उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Trust chairman: टाटा ट्रस्टचा पुढील अध्यक्ष कोण होणार? नोएल टाटांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता

Latest Marathi News Updates : नवीन शैक्षणिक धोरणात महाराष्ट्र आघाडीवर - चंद्रकांत पाटील

Ladki Bahin Yojana : पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींची झुंबड! शासकीय बँकांबाहेर महिलांच्या रांगा; खात्यावरील पैसे मिळवताना दमछाक

Jalgaon Bribe Crime: पीएफ कार्यालयातील मुख्य वित्त, लेखाधिकाऱ्यास अटक; 25 हजारांची लाच घेताना पुणे सीबीआय पथकाचा छापा

Nashik News : बोधीवृक्षांमुळे देश-विदेशातील पर्यटकांची मांदियाळी! त्रिरश्मी लेणी रोपणास एक वर्ष पूर्ण

SCROLL FOR NEXT