Uddhav Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : सत्तेवर आल्यास धारावीची निविदा रद्द करू ; उद्धव ठाकरे यांचा निर्धार,रंगशारदात पदाधिकाऱ्यांचा मेळावा

‘‘सत्तेत आल्यावर धारावी प्रकल्पाची निविदा रद्द करू,’’ असा निर्धार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुखे उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. येथील रंगशारदा सभागृहात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मेळावा आज पार पडला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘सत्तेत आल्यावर धारावी प्रकल्पाची निविदा रद्द करू,’’ असा निर्धार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुखे उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. येथील रंगशारदा सभागृहात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मेळावा आज पार पडला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की धारावीकरांना मुलुंड, दहिसर, मिठागरात टाकायचा या सरकारचा डाव आहे. त्यांची ‘कंत्राटदार माझा लाडका योजना’ सुरू आहे.

त्यामुळे मुंबईत पावसात पाणी तुंबतंय. बीएमसीची ९० हजार कोटींच्या ठेवी होत्या. आता किती राहिल्यात ते सांगत नाहीत. ‘एमएमआरडीए’ला महापालिका पैसा देत आहे. महापालिका असताना ‘एमएमआरडीए’ची गरजच नाही. मुख्यमंत्री शिंदे यांची सत्ता असलेली ठाणे महापालिका डबघाईला आली आहे.

...तर मुंबई उपऱ्यांच्या हातात जाईल

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं. ‘हा लढा शिवसेनेच्या अस्मितेचा नसून मुंबईच्या अस्तित्वाचा आहे. अजूनही पक्षातून कोणाला जायचे असेल तर जा. दगाबाजी करू नका. शिवसैनिकांना घेवून मी ही लढाई जिंकेन. काही माजी नगरसेवक जातायत. त्यांनी आताच जावे,’ असे म्हणत ठाकरे म्हणाले की, हे व्यापारी आपल्यात फूट पाडतायत. एवढे खाताय ते जातंय कुठे?

खायला काही मर्यादा आहे की नाही? धनाढ्य व चोऱ्यामाऱ्या करणारे दुबार मतनोंदणी करताहेत. उपरी मुंबई वसवायला यांना मतदान करायचे का? यावेळी झोपून राहिलो तर मुंबई उपऱ्याच्या हातात जाईल, असा इशारा त्यांनी दिला. हातात भिकेचा कटोरा घेऊन तुम्हाला आमच्यासमोर यावे लागेल. या लोकांविरोधात बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती पण आम्ही बोललो,’ असे ठाकरेंनी ठणकावून सांगितले.

मुस्लिमांना आमचं हिंदुत्व मान्य

ठाकरे म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीवेळी एका प्रचारसभेत मोठ्या संख्येने मुस्लिम आले होते. तिथं मी जाहीरपणे त्यांना प्रश्न केला की मी हिंदुत्व सोडलंय का? त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं आणि तुमचे हिंदुत्व आम्हाला मान्य असल्याचंही सांगितलं. मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर समाजही आपल्यासोबत येत आहेत. गृहसंकुलांमध्ये, कंपन्यांमध्ये मराठी माणसाला प्रवेश नाही म्हणतात. त्यांचे कानफाट फोडा. गुजरातला जायला सांगा,’’ असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore : 'रात्रीचे खेळ सांगायला आम्हाला भाग पाडू नका'; आमदार जयकुमार गोरेंचा कोणाला इशारा?

Latest Maharashtra News Updates :सोशल मीडिया इन्फ्लून्सरवर पोलिसांची कारवाई; चाकूचा धाक दाखवून धमकी दिल्याचे प्रकरण अंगावर

IND vs SA : आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात Axar Patel चा अफलातून कॅच; करून दिली ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची आठवण

BSNL IFTV : BSNLने सुरु केली पहिली इंट्रानेट टीव्ही सेवा; 500+ लाईव्ह चॅनेल्स अन् OTT प्लॅटफॉर्म्सचं कनेक्शन कसं घ्यायचं? वाचा

'उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी दगाबाजी केली अन् काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसले'; विनोद तावडेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT