mahavikas aaghdi sakal
महाराष्ट्र बातम्या

जिल्ह्यातील ‘या’ 5 मतदारसंघांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा! लोकसभा निवडणुकीत नेत्यांच्या पक्षांतरामुळे महाविकास आघाडीसमोर मोहोळ, दक्षिण सोलापूर, करमाळ्याचा पेच

सोलापूर व माढा हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहेत. शिवसेनेला तेथे संधी नसल्याने विधानसभा निवडणुकीत समान जागा द्याव्या लागतील हे निश्चित. काँग्रेसचा सद्य:स्थितीत 3 तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा 5 मतदारसंघांवर दावा आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ जागावाटपात अनुक्रमे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहेत. शिवसेनेला त्याठिकाणी संधी नसल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांना समानप्रमाणात जागा द्याव्या लागतील हे निश्चित. दुसरीकडे काँग्रेसचा सद्य:स्थितीत तीन तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा पाच मतदारसंघांवर दावा आहे. सांगोला मतदारसंघ ‘शेकाप’ला सोडावा लागणार असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सद्य:स्थितीत दोनच जागा मिळतील अशी स्थिती आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. मोहोळमध्ये मागील विधानसभा निवडणुकीतील तिन्ही उमेदवार आता महायुतीसोबत आहेत. माळशिरसमध्ये मागच्यावेळी मोहिते-पाटलांच्या मदतीने सातपुते आमदार झाले होते. करमाळ्यातही मोहिते-पाटलांची राजकीय ताकद आहे. माळशिरस, दक्षिण सोलापूर, पंढरपूर-मंगळवेढा, बार्शी, मोहोळ, करमाळा, माढा या मतदारसंघातील आमदार महायुतीचेच आहेत, तरीदेखील लोकसभेला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तेथून मताधिक्य मिळाले आहे.

या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी विधानसभेला ताकदवान चेहऱ्याला संधी देऊ शकते. काही मतदारसंघात उद्धव ठाकरेंची शिवसेना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना उमेदवारांमध्येच प्रमुख लढत होऊ शकते. त्यावेळी शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपची मदत प्रबळ ठरणार की शरदचंद्र पवार राष्ट्रवादी व काँग्रेसची मदत त्यांच्या उमेदवारांना आमदार करणार, याचीही उत्सुकता असणार आहे. तत्पूर्वी, महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीला इच्छुकांची नाराजी न ओढावता मतदारसंघांचा पेच सोडवावा लागणार आहे.

‘महाविकास’मधील पक्षांचे मतदारसंघावरील दावे

  • काँग्रेस : पंढरपूर-मंगळवेढा, शहर मध्य, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट

  • राष्ट्रवादी काँग्रेस : पंढरपूर-मंगळवेढा, माळशिरस, माढा, शहर उत्तर, मोहोळ, करमाळा

  • शिवसेना (उद्धव ठाकरे गट) : बार्शी, करमाळा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, सांगोला

‘या’ मतदारसंघांचा सोडवावा लागणार तिढा

करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटलांनी लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. आता माढ्याचा खासदार त्यांच्याच पक्षाचा असल्याने आगामी निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेला सुटणार की राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) आपल्याकडे घेणार, याची उत्सुकता आहे. लोकसभेत करमाळा व माढा विधानसभा मतदारसंघात मोठे मताधिक्य खासदार धैर्यशील मोहिते-पाटलांना मिळाल्याने दोन्हीकडील इच्छुक उमेदवारांचा आत्मविश्वास वाढला आहे. तसेच मोहोळमध्येही अशीच स्थिती आहे, पण तेथे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचा दावा असून, याठिकाणी लोकसभा निवडणुकीत भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या संजय क्षीरसागर यांना उमेदवारी मिळू शकते. दक्षिण सोलापुरात काँग्रेसने रणनीती आखायला सुरवात केल्याने या मतदारसंघावर काँग्रेसचा दावा कायम आहे.

विधानसभानिहाय २०१९ मधील लढती

  • १) सांगोला : शहाजी पाटील (शिवसेना) विरुद्ध अनिकेत देशमुख (शेकाप) : पाटील ७८६ मतांनी विजयी

  • २) माळशिरस : राम सातपुते (भाजप) विरुद्ध उत्तमराव जानकर (राष्ट्रवादी) : सातपुते २५९० मतांनी विजयी

  • ३) करमाळा : संजय शिंदेविरूद्ध नारायण पाटील (दोन्ही अपक्ष) व रश्मी बागल (शिवसेना) : शिंदे ५४९४ मतांनी विजयी

  • ४) माढा : बबनराव शिंदे (राष्ट्रवादी) विरुद्ध संजय कोकाटे (शिवसेना) : शिंदे ६८ हजारांहून अधिक मतांनी विजयी

  • ५) मोहोळ : यशवंत माने (राष्ट्रवादी) विरुद्ध नागनाथ क्षीरसागर (भाजप) : माने २१,६९९ मतांनी विजयी

  • ६) दक्षिण सोलापूर : सुभाष देशमुख (भाजप) विरुद्ध बाबा मिस्री (काँग्रेस) : देशमुख २९,२४७ मतांनी विजयी

  • ७) अक्कलकोट : सचिन कल्याणशेट्टी (भाजप) विरुद्ध सिद्धाराम म्हेत्रे (काँग्रेस) : कल्याणशेट्टी ३६,७६९ मतांनी विजयी

  • ८) पंढरपूर-मंगळवेढा : समाधान आवताडे (भाजप) विरुद्ध भगिरथ भालके (राष्ट्रवादी) :आवताडे ३,७३३ मतांनी विजयी

  • ९) शहर उत्तर : विजयकुमार देशमुख (भाजप) विरुद्ध आनंद चंदनशिवे (‘वंचित’), मनोहर सपाटे (राष्ट्रवादी) : देशमुख ७७,३२४ मतांनी विजयी

  • १०) शहर मध्य : प्रणिती शिंदे (काँग्रेस), फारुख शाब्दी (एमआयएम), नरसय्या आडम (माकप), दिलीप माने (शिवसेना), महेश कोठे (अपक्ष) : प्रणिती शिंदे विजयी

  • ११) बार्शी : राजाभाऊ राऊत (अपक्ष) विरुद्ध दिलीप सोपल (शिवसेना), निरंजन भूमकर (राष्ट्रवादी) : राऊत ३०७६ मतांनी विजयी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT