Mahavikas Aghadi PC:नुकतीचं महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडली. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तिन्ही पक्षांचे नेते हजर होते. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मुंबईबाबत एक महत्वाचे विधान केले आहे. त्याचबरोबर केंद्रात आणि राज्यात त्यांचं सरकार आल्यावर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावर उद्धव ठाकरेंनी सूचक विधान केले आहे.
ठाकरेंनी आरोप केला की महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करुन केंद्रशासित प्रदेश निर्माण करणं केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर आरोप केला की त्यांना सर्व राज्य आणि शहरांवर एकछत्री अंमल लागू करायचा आहे. महाविकास आघाडी आणि इंडिया युतीचं सरकार राज्यात आणि केंद्रात आल्यावर केंद्र सरकारने घेतलेले निर्णय फिरवण्याचा इशारा यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला.
माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मुंबई वेगळी करणं आणि मुंबई केंद्रशासित करणं हा डाव उघड झाला आहे. आम्ही सत्तेत असताना त्यांची हा प्रस्ताव आणण्याची हिंमत नव्हती. आणि आता सुद्धा हा प्रस्ताव आम्ही होऊ देणार नाही. ज्या क्षणी केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार येईल हे त्यांचे सगळे पाश तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. मुंबईची स्वायत्तता आम्ही अबाधित ठेऊ."(Latest Marathi News)
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की,"दिल्लीसाठी जेव्हा त्यांनी प्रस्ताव आणला तेव्हा आमच्या मनात भीती होती. दोन तीन मोजक्या गोष्टी सोडल्या तर केंद्राला त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. मात्र, हा हस्तक्षेप दिवसागणिक ते वाढवचं चाललेत. राज्याची आणि शहरांची स्वायतत्ता मारुण सगळीकडे एकछत्रीपणा आणायचा, ही छत्री आम्ही मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. थोड्या दिवसांची गोष्ट आहे, सरकार आणचं दोन्हीकडे आल्यानंतर हे निर्णय आम्ही करत फिरवू"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.