Ujni Boat Accident : उजनी धरण पात्रात मंगळवार (ता.21) रोजी भयंकर घटना घडली. यावेळी या ठिकाणी बोट उलटली अन् अनर्थ झाला. या बोटीत एकूण 7 प्रवासी होते. वादळी वाऱ्यात अडकल्याने हा अपघात झाला. सकाळीच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाल आहे. पथकाने शोधकार्याची मोहीम हाती घेतली आहे. (Ujni Boat Accident latest News)
याबाबत अधिक माहिती अशी की,मंगळवार रोजी सायंकाळी कुगाव येथून गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकूळ जाधव (वय २५), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय ३, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), गौरव डोंगरे (वय 16 वर्षे), सोलापूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले राहुल डोंगरे या प्रवाशांना घेऊन बोट चालक अनुराग अवघडे (वय ३५) कळाशीच्या दिशेने निघाला होता.(pune news)
बोट काही अंतरावर पुढे गेली असता अचानक जोरदार सुटलेल्या वादळ आणि पावसाने नदीपात्रात लाटा निर्माण झाल्याने बोट उलटली.(solapur news)
मिळालेल्या माहिती नुसार यावेळी या बोटीत प्रवास करत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे बोट पलटी झालेल्या ठिकाणीहून पोहत कळाशी (ता.इंदापूर) च्या किनाऱ्यालगत आले. मात्र गोकूळ दत्तात्रय जाधव यांना पोहता येत असूनही त्यांना आपला जीव वाचवता आला नाही.(maharashtra News)
गोकूळ जाधव हे पत्नी कोमल जाधव (वय २५), मुलगी माही जाधव (वय ३),मुलगा शुभम जाधव (वय दीड वर्ष) यांना वाचवाचा प्रयत्न करत होते. अशावेळी आपल्या कुटुंबाला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न गोकूळ जाधव यांनी केला. मात्र पोहता पोहता गोकूळ यांना दम लागला. त्यांना कुटुंबाला वाचवता आले नाही. आणि या प्रयत्नात त्यांचाही जीव गेला.(latest marathi news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.