Ganpat Gaikwad Firing Video  
महाराष्ट्र बातम्या

Ganpat Gaikwad Firing Video : आधी गोळ्या झाडल्या अन् मग... पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं? घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर

रोहित कणसे

Ulhasnagar Ganpat Gaikwad Firing Video : उल्हासनगर येथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आता या गोळीबाराच्या घटनेचं व्हिडीओ फुटेज समोर आलं आहे. पोलीस स्टेशनच्या आतमध्ये घडलेल्या घडामोडी या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. ज्यात सुरूवातीला गोळीबार आणि त्यानंतर दोन गटात सुरु असलेला हाणामारी स्पष्ट दिसत आहे.

काल रात्री शिवसेना शिदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि त्यांच्या एका मित्रावर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे जखमी झालेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

वाद काय आहे?

महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावातील जमिनीवरुन दोघांमध्ये वाद सुरू होता. इतकेच नाही तर त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत शिंदे गटाकडून पाडण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं. याच दरम्यान गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये हल्ला करण्यात आला. यादरम्यान पाच ते सहा गोळ्या झाडण्यात आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sameer Wankhede: समीर वानखेडे सेनेच्या तिकीटावर निवडणूक लढणार? या दोन जागांबाबत शिंदेंशी चर्चा; पक्षानं स्पष्टचं सांगितलं

IND vs NZ 1st Test : Rishabh Pant ला दुखापत, सोडावे लागले मैदान! टीम इंडियासाठी दुष्काळात तेरावा महिना...

Latest Maharashtra News Updates : तारीख ठरली! दिपक मानकर शनिवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा देणार राजीनामा

Beed Assembly Election : विद्यमान दोघांनाच उमेदवारीची गॅरंटी, मविआ-महायुतीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ

Wipro Bonus Share: विप्रोने तोडले सर्व रेकॉर्ड; सलग चौदा वेळा दिला बोनस शेअर, भागधारक होणार मालामाल

SCROLL FOR NEXT