नागपूर: उपराजधानीत रेफर होऊन येणाऱ्या तब्बल ४६ गरोदर माता दर महिन्याला मेलेले बाळ पोटात घेऊन मेयो, मेडिकलमध्ये बाळंतपणासाठी येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वर्षभरात ५५२ गरोदर माता मृत बाळ पोटात घेऊन प्रसूतीसाठी आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
या मृत्यूला वैद्यकीय भाषेत ‘स्टील बर्थ’ म्हणतात. संपूर्ण विदर्भातून गरोदर महिला नागपूरला येतात. जिल्हा रुग्णालयापासून तर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारात हयगय झाल्यानंतर किंवा गरोदरपणात मातेचा अचानक रक्तदाब वाढल्यानंतर त्वरित उपचार होत नाही.
रक्तस्राव होतो आणि बाळ गर्भातच दगावण्याची शक्यता असते. विशेषतः मेळघाट, धारणी, चिखलदरा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर शहर, जिल्हा, तालुका व गावखेड्यातून मेडिकल, मेयोत या मातांना रेफर केले जाते.
२०२२ मध्ये नागपुरात ५५२ माता दगावलेले बाळ पोटात घेऊन प्रसुतीसाठी आल्या होत्या. यातील २२३ या नागपूर शहरातील आहेत. उर्वरित ३२९ मातांना विविध रुग्णालयांतून मेयो, मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले. स्टील बर्थ अर्थात उपजत मृत्यूचा वाढत असलेला हा आकडा धक्कादायक आहे.
रक्तदाब ‘स्टील बर्थ’चे कारण: डॉ. माधुरी पाटील
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) स्त्री व प्रसुतीरोग विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. माधुरी पाटील यांनी मेयोत रेफर होऊन आलेल्या २१४ गर्भवतींचा आणि दगावलेल्या बाळांचा अभ्यास केला.
यात गरोदरपणातील उच्च रक्तदाबानंतर झालेला रक्तस्राव हे ‘स्टील बर्थ’चे मुख्य कारण असल्याचे अभ्यासातून पुढे आले. विशेष असे की, यातील ९० टक्के माता इतर रुग्णालयातून रेफर होऊन येतात.
गर्भवती असताना त्यांची योग्य काळजी घेण्यात न आल्यामुळे रक्तदाब वाढतो. गरोदर असताना रक्तदाब वाढताच रुग्णालयात तपासणी करणे आवश्यक आहे.
सोनोग्राफीद्वारे बाळाची तपासणी करता येते. प्रत्येक गर्भवतीने या काळात रक्तदाबाला गंभीरपणे घ्यावे. रक्तदाबावर उपचार करावे, असा सल्ला डॉ. पाटील यांनी दिला.
२०२२-२३ साली झालेले ‘स्टील बर्थ’
मेडिकलमध्ये मृत बाळ पोटात घेऊन येणाऱ्या माता - २०१
मेयोत मृत बाळ पोटात घेऊन येणाऱ्या माता -१४८
-डागासह खासगी व इतर रुग्णालयात येणाऱ्या माता -२०३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.