solapur univercity Esakal
महाराष्ट्र बातम्या

विद्यापीठाच्या परीक्षा ६ नोव्हेंबरपासून! ‘अभियांत्रिकी’ची परीक्षा डिसेंबरमध्ये; 30 दिवसांत निकालाचे नियोजन; ‘कॅरीऑन’मधून ‘त्या’ विद्यार्थ्यांना एकमेव संधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची परीक्षा ६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. सुरवातीला पारंपरिक अभ्यासक्रमाची (बीए, बी. कॉम, बीएससी) परीक्षा सुरू होईल. त्यानंतर डिसेंबरपासून व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा सुरू होईल.

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची परीक्षा ६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. सुरवातीला पारंपरिक अभ्यासक्रमाची (बीए, बी. कॉम, बीएससी) परीक्षा सुरू होईल. त्यानंतर डिसेंबरपासून व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा सुरू होईल. विद्यापीठाने तसे तात्पुरते वेळापत्रक तयार केले असून काही दिवसांत ते अंतिम केले जाणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित १०९ महाविद्यालये असून त्याअंतर्गत अंदाजे ६८ ते ७० हजार विद्यार्थी प्रवेशित आहेत. या विद्यार्थ्यांची २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील पहिली सत्र परीक्षा ६ नोव्हेंबरपासून घेतली जाणार आहे. परीक्षेचा निकाल वेळेत जाहीर होण्यासाठी पारंपरिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका ऑफलाइन पद्धतीने तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनस्क्रिन पद्धतीने होणार आहेत. मार्चमध्ये विद्यार्थ्यांना कॅम्पस सिलेक्शनमधून नोकरीची संधी उपलब्ध होते. त्यामुळे परीक्षा वेळेत घेऊन निकालही वेळेत प्रसिद्ध व्हावेत, यादृष्टीने विद्यापीठाने नियोजन केले आहे. निकाल आणखी कमी दिवसांत जाहीर व्हावेत, यासाठी विद्यापीठाकडून वारंवार सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडे पाठपुरावा केला जात आहे.

‘कॅरीऑन’मधून ‘त्या’ विद्यार्थ्यांना एकमेव संधी

प्रथम व द्वितीय या दोन्ही वर्षांत अनुत्तीर्ण झालेल्या किंवा दोन्हीपैकी एका वर्गातील सर्व विषय निघाले, पण एका वर्गातील काही विषय राहिले आहेत, त्या विद्यार्थ्यांना आता ‘कॅरीऑन’च्या माध्यमातू्न थेट तृतीय किंवा अंतिम वर्षासाठी प्रवेश घेण्याची संधी विद्यापीठाने दिली आहे. आता नोव्हेंबरपासून सुरू होणारी सत्र परीक्षा त्यांच्यासाठी शेवटची संधी असणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीवरून विद्यापीठाने त्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून हा ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदाच घेतला आहे. परंतु, या सत्र परीक्षेत पहिल्या दोन वर्षांतील अनुत्तीर्ण विषयात उत्तीर्ण न होणाऱ्या विद्यार्थ्यास पुन्हा पूर्वीच्याच वर्गात बसावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी परीक्षा अन्‌ निकाल वेळेतच

कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, प्र कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने ६ नोव्हेंबरपासून परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. दुसरीकडे परीक्षा झाल्यापासून ३० दिवसांत निकाल प्रसिद्ध करण्याचेही नियोजन आम्ही केले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची खबरदारी विद्यापीठाकडून घेतली जात आहे.

- डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

IPL Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पुढील 3 हंगामाच्या तारखा BCCI ने केल्या जाहीर

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Pre Wedding Photoshoot: 'या' लोकेशनवर फोटोग्राफरशिवायही करू शकता जोडीदारासोबत परफेक्ट फोटोशुट

Google Gemini : गुगल जेमीनीची मेमरी झाली शार्प! काय आहे या नव्या फीचरमध्ये खास?

SCROLL FOR NEXT