Thane Unlock 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात पाच टप्प्यात 'अनलॉक'; कुठे काय सुरु, काय बंद?

सूरज यादव

राज्यातील लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच टप्पे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यानुसार जिल्ह्यांची वर्गवारी केली आहे.

राज्यातील लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच टप्पे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यानुसार जिल्ह्यांची वर्गवारी केली आहे. त्या जिल्ह्यांमधील गेल्या आठवड्यातील आकडेवारीनुसार कोणत्या वर्गवारीत त्याचा समावेश असेल ते ठरणार आहेत. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये 5 टक्के पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. यात पहिल्या टप्प्यात 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेडवर असलेले पेशंट आणि दुसऱ्या टप्प्यात 25 ते 40 टक्के ऑक्सिजन बेडवर पेशंट असलेल्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात पॉझिटिव्हिटी दर 5 ते 10 टक्के किंवा 40 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण ऑक्सिजन बेडवर असणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. चौथ्या टप्प्यात पॉझिटिव्हिटी दर 10 ते 20 टक्के आणि ऑक्सिजन बेड्स 60 टक्क्यांहून जास्त भरलेल्या जिल्ह्यांचा समावेश असेल. तर अखेरच्या पाचव्या टप्प्यात पॉझिटिव्हिटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त किंवा ऑक्सिजन बेड्स ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भरलेल्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे राज्यात एकही जिल्हा पाचव्या टप्प्यात येत नाही. कोणत्याच जिल्ह्यात 20 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हीटी रेट नाही.

कोणत्या टप्प्यात काय सुरु काय बंद ?

पहिल्या टप्पा - कोरोना पॉझिटिव्हिटी दर 5 टक्के आणि 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले जिल्हे

  • सर्व प्रकारची दुकाने सुरु करता येणार

  • रेस्टॉरंट, मॉल, थीएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहांना परवानगी

  • लोकल सेवा पूर्ववत, मात्र परिस्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे निर्बंध घालण्याचे अधिकार

  • सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहणार, वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी

  • सर्व खासगी कार्यालये उघडता येतील, सरकारी कार्यालये 100 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू

  • विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना मुभा

  • लग्न सोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर निर्बंध नाहीत

  • जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी

  • सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत

दुसरा टप्पा - पॉझिटिव्हिटी दर 5 टक्के आणि 25 ते 40 टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरलेले जिल्हे

  • सर्व प्रकारची दुकाने पूर्णवेळ सुरू राहणार

  • रेस्टॉरंट, मॉल, थीएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येणार

  • लोकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी

  • सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहणार, वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी

  • सर्व खासगी कार्यालये उघडता येतील, सरकारी कार्यालये 100 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू

  • खेळांसाठी सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत परवानगी

  • सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीची अट, चित्रीकरण नियमितपणे करता येईल

  • लग्न सोहळ्यासाठी हॉलमधील आसन क्षमतेच्या 50 टक्के किंवा जास्ती जास्त 100 जणांना परवानगी, अंत्यविधीसाठी निर्बंध नाहीत

  • जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना 50 टक्के क्षमतेनं परवानगी

  • सार्वजनिक वाहतूक 100 टक्के सुरू

  • जमावबंदी लागू राहणार

तिसरा टप्पा - पॉझिटिव्हिटी दर 5 ते 10 टक्के किंवा 40 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड भरलेले जिल्हे

  • सायंकाळी 4 वाजेपर्यंत सर्व अत्यावश्यक दुकाने खुली ठेवण्यास परवानगी

  • इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू, वीकेंडला बंद

  • सार्वजनिक वाहतूक, रेस्टॉरंट, मॉल, थिएटर, कार्यक्रम यासह इतर गोष्टींसाठीचे निर्बंध कायम राहतील.

चौथा टप्पा - पॉझिटिव्हिटी दर 1 0ते 20 टक्के आणि ऑक्सिजन बेड्स 60 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले जिल्हे

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने चार वाजेपर्यंत सुरू, अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने पूर्णपणे बंद

  • सार्वजनिक वाहतूक, रेस्टॉरंट, मॉल, थिएटर, कार्यक्रम यासह इतर गोष्टींसाठीचे निर्बंध कायम राहतील.

पाचवा टप्पा - पॉझिटिव्हिटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त किंवा ७५ टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड्स भरलेले जिल्हे

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू

  • वीकेंडला मेडिकल वगळता इतर दुकाने बंद

  • सार्वजनिक वाहतूक, रेस्टॉरंट, मॉल, थिएटर, कार्यक्रम यासह इतर गोष्टींसाठीचे निर्बंध कायम राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सहलीसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, आई-वडिलांसह मुलगा-मुलगी अपघातात जागीच ठार; गाय आडवी आली अन्..

Latest Maharashtra News Updates : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींनी केला फोन, काय आहे कारण?

Donald Trump : रशिया-युक्रेन युद्ध थांबवू... डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही; मृतांबद्दल दुःख व्यक्त

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ‘काम करणारा मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा झाली यशस्वी

Baba siddiqui Murder case: बिश्नोईच्या हिट लिस्टवर कॉमेडिन मुन्नवर फारुकी अन् श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला; सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT