Unseasonal rain Alert 
महाराष्ट्र बातम्या

Unseasonal Rain Alert : पुढील ३-४ तास महत्वाचे! राज्यातील 'या' जिल्ह्यांना वादळी-वाऱ्यासह पावसाचा इशारा

IMD Maharashtra Rain Alert Latest News : राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात हवामान विभागाकडून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

रोहित कणसे

IMD Maharashtra Rain Alert Latest News : राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात हवामान विभागाकडून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या तीन ते चार तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आले आहे. तसेच पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत देखील पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

आज (१ मार्च) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गडगडाटी वादळासह पुढील ३-४ तासांत धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घ्या असा इशारा भारतीय हवामान विभाग मुंबई (IMD Mumbai) कडून देण्यात आला आहे. आयएमडी पुणे प्रमुख आणि शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.

मध्य महाराष्ट्रातील वाढत्या तापमानामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत ढगांच्या गडगटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यासोबत काही भागात गारपीट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत ढगाळ वातावरण आणि पावसामुळे वाढलेला उन्हाचा चटका कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

'या' ठिकाणी पावसाची शक्यता..

राज्यातील छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर पुणे, सातारा, जालना, ठाणे रायगड आणि नंदूरबार जिल्ह्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवसांत कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भाग आणि मराठवाडा, विदर्भातील काही भागांत वीजांसह पाऊस होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT