मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद हीच्या व्हिडिओजमुळं सध्या महाराष्ट्रातलं वातावरण भलतंचं तापलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीला जोरदार विरोध केला आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उर्फी अल्पसंख्यांकं असल्यानचं तिला विरोध केला जात असल्याचं म्हटलं होतं. याला आता वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Urfi Javed Case Chitra Wagh reply on Sushma Andharen alligations)
वाघ म्हणाल्या, "मी ही भूमिका घेतल्यानंतर त्यात उड्या पडणं सहाजिकचं होतं. त्या पडल्या सुद्धा यामध्ये कोण काय काय बोललं त्यांना उत्तरं देण्यासाठी यावं लागतं. कोणीतरी आज सकाळी विषय काढला की, ती या धर्माची आहे म्हणून तुम्ही असं बोलता का?"
"यामध्ये धर्म नाहीच मी पुन्हा सांगते यामध्ये धर्म किंवा ती उर्फी आहे म्हणून तिला विरोध नाहीच तिच्या नंगानाचला विरोध आहे. तुम्ही चार भिंतीच्या आत काय उघडे नाचता की नागड नाचता हे बघायला कोणी येत नाही. पण सार्वजनिक ठिकाणी असा नंगा नाच आम्ही चालू देणार नाही," असं यावेळी वाघ म्हणाल्या.
हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड
राष्ट्रवादी काँग्रेसचं असं म्हणणं आहे की, उर्फी मुस्लीम मुलगी आहे म्हणून त्यांच्या डोक्यातून हे आलं आहे. कशा पद्धतीनं सामाजिक तेढ वाढेल आणि विषय भरकटवला जाईल याचसाठी हे काम करतात. म्हणून विषय धर्माचा नाहीच, अशा शब्दांत चित्र वाघ यांनी सुषमा अंधारे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.