उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Legislative Council elections) समाजवादी पक्षासोबत आमची आघाडी निश्चित झालेली आहे. उत्तर प्रदेशात पाच वर्षे भाजपची सत्ता होती. या काळात गरीब, मजूर व महिलांवर अन्याय झाला आहे. अन्याय आणि अत्याचार झालेल्यांची वेगळी लाट उत्तर प्रदेशमध्ये आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (National Congress party) नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) म्हणाले.
मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बैठकीमध्ये महामंडळ महाराष्ट्रातील संघटन आणि इतर राज्यातील निवडणुकांसंदर्भात चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात सद्य अन्याय आणि अत्याचार झालेल्यांची वेगळी लाट आहे. असे असताना धर्माच्या नावावर लोक आमच्या सोबत असल्याचे भाजपचे लोक भासवत आहे, असेही नवाब मलिक (nawab malik) म्हणाले.
ज्योतिष शास्त्र आमच्याकडे नाही
१९९३ ला मंदिर व मशिदीच्या नावाने जातीय दंगली झाल्या होत्या. त्यावेळेस भाजपला (BJP) पराभव स्वीकारावा लागला होता. आता पाच वर्ष जनतेवर केलेला अन्याय हे या सरकारच्या सध्या विरोधात आहे. पोपटाद्वारे चिठ्ठी काढणे, भविष्यवाणी करणे हे काम अमित शहा व नरेंद्र मोदी करीत होते. शरद पवार यांच्यावर सर्वांचा विश्वास आहे. शरद पवार हे पंतप्रधान पदाचे उमेदवार नाही. मुख्यमंत्र्यांच्या आजाराबाबत भाजपचे लोक जी टीका करीत आहेत ती योग्य नाही, असेही नवाब मलिक म्हणाले.
सर्वांनी एकत्र येऊन पर्याय निर्माण केला पाहिजे
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) निवडणुकीत (Legislative Council elections) समाजवादी पक्षासोबत आम्ही जाणार ही सहा महिन्यांपासून आमची स्पष्ट भूमिका होती. अखिलेश यादव आणि प्रफुल पटेल यांच्यात बोलणे झाले आहे. आम्हाला ज्या जागा पाहिजे त्या आमच्यासाठी ते सोडत आहेत. मला नेतृत्व नको असे शरद पवार यांनी आधीच स्पष्ट केले आहे. सर्वांनी एकत्र येऊन पर्याय निर्माण केला पाहिजे, अशी पवार साहेबांची भूमिका आहे, असेही नवाब मलिक (nawab malik) म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.